सोशल मीडिया युझर्ससाठी मोठी बातमी! तीन प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Whatsapp, Facebook, Instagram होणार विलीन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणार्‍या फेसबुक (व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक) च्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सध्या होत आहे. फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम ताब्यात घेतले होते, जे आतापर्यंतचे सर्वात मोठे अधिग्रहण आहे. दोन लोकप्रिय प्लॅटफॉर्म खरेदी केल्यानंतर अशी अटकळ बांधली जात होती की, हे तीनही प्लॅटफॉर्म काम करण्यासाठी एकत्र केले जातील की नाही ?. मागील वर्षी फेसबुकचे प्रमुख झुकरबर्ग यांनी हे स्पष्ट केले की, भविष्यात एक अद्वितीय सेवा देण्यासाठी त्यांचे हे तीनही प्लॅटफॉर्म विलीन करण्याची आपली योजना आहे.

फेसबुकचे हे थ्री इन वन प्लॅटफॉर्म
आता फेसबुक व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजरला एकत्र विलीन करण्याची तयारी करत आहे. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम युझर्स सुद्धा या प्लॅटफॉर्मवर आपापसात संवाद साधू शकतील. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची प्रचंड पोहोच पाहता असे म्हणता येईल की फेसबुकच्या एका प्लॅटफॉर्ममधील हे तीनही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या क्षेत्रात गेम चेंजर ठरू शकतील.

डेटाबेस तयार करीत आहे
WABetaInfo च्या अहवालाने असे संभाव्य फीचर दर्शविले आहे. WABetaInfo ने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुक मेसेंजर वापरुन या तीनही प्लॅटफॉर्मवर कनेक्शन तयार करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. फेसबुक लोकल डेटाबेसमध्ये टेबल्स तयार करीत आहे जे व्हॉट्सअ‍ॅप युझर्सचे मेसेजेस आणि सर्विसचे आयोजन करण्यात उपयुक्त ठरेल. त्यांचा वापर करून, फेसबुक कॉन्टेक्ट नंबर आणि मेसेजेस गोळा करण्यास सक्षम असेल अगदी पुश नोटिफिकेशन्सच्या साउंड सहित.

ही प्रक्रिया अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे आणि म्हणूनच फेसबुक आपल्या युझर्ससह इतर प्लॅटफॉर्मवर संवाद साधण्याची ही सुविधा विकसित करण्यास किती काळ घेईल हे सांगणे आटा कठीण जाईल. कदाचित हे देखील होऊ शकेल की भविष्यात ही योजना पुढेही जाऊ शकणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.