हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या काळात आधार एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट बनला आहे. म्हणूनच आपल्या मनात त्याच्या वापरा बद्दल बरेच प्रश्न निर्माण होतायत. उदाहरणार्थ, जर मी माझे बँक खाते, शेअर्स, म्युच्युअल फंड आणि मोबाइल नंबर आधारशी कनेक्ट केले, तर माझी ही माहिती UIDAI कडे तर पोहोचणार नाही किंवा दुसरे कोणीही ही माहिती चोरणार तर नाही ना. तुमच्या मनातही असा प्रश्न येत असेल तर त्याचे उत्तर आम्ही तुम्हांला देऊ.
उत्तर – अजिबातच नाही. जेव्हा आपण आपला आधार नंबर आपल्या बँक खात्याशी, म्युच्युअल फंड कंपनी आणि मोबाइल फोन कंपन्यांना देता, तेव्हा ते फक्त आपल्या ओळखीच्या पडताळणीसाठी आपला आधार क्रमांक, बायोमेट्रिक आणि नाव इत्यादी UIDAI ला पाठवतात.
बँक अकाउंट किंवा इतर डीटेल्स UIDAI कडे पाठविले जात नाहीत. UIDAI चा प्रश्न आहे की, अशा व्हेरिफिकेशन रिक्वेस्टला ते होय किंवा नाही असे उत्तर देतात.
व्हेरिफिकेशनचे उत्तर जर होय असेल तर तुमची बेसिक केवायसी माहिती (नाव, पत्ता, फोटो इ.) सर्विस प्रोवायडरला दिली जाते.
अनेकदा आधारच्या गैरवापराविषयीच्या बातम्या येत असतात. अलीकडेच एका वृत्तपत्राने बातमी दिली होती की आधार डेटाबेसमध्ये फक्त 500 रुपयांमध्ये मिळू शकतो. म्हणूनच UIDAI ने अशा काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.