Monday, February 6, 2023

Gratuity कधी मिळते ??? नोकरी लवकर सोडल्याने काय नुकसान होईल ते पहा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gratuity : आपण एखाद्या खाजगी कंपनीत (Private Company) काम करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. पगार, पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी व्यतिरिक्त एकाच कंपनीत दीर्घकाळ काम करणार्‍या कर्मचार्‍यांना ग्रॅच्युइटी देखील दिली जाते. ग्रॅच्युइटी म्हणजे कंपनीकडून एखाद्या कर्मचार्‍याला मिळालेले बक्षीस. Gratuity कडे कंपनीप्रती असलेल्या आपल्या निष्ठेचा सन्मान करण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले जाऊ शकते. मात्र, ती नक्की कधी दिली जाते याबाबत अनेकांचा गैरसमज आहे.

Proposed Reforms to the Payment of Gratuity Act, 1972

- Advertisement -

बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की, कंपनीमध्ये 5 वर्षे पूर्ण झाल्यावरच ग्रॅच्युइटी मिळेल. मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण आपण कंपनीमध्ये 5 वर्ष पूर्ण होण्याआधीच ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी पात्र ठरतो. जर आपण एखाद्या कंपनीमध्ये 4 वर्षे 240 दिवस काम केले तर Gratuity साठी पात्र ठरतो.

आता जर आपण वर नमूद केलेल्या वेळेनंतर कंपनी सोडली अथवा नोकरीतून निवृत्त झालो तरीही आपल्याला ग्रॅच्युइटी दिली जाईल. कंपनी ती नाकारू शकत नाही. तसेच जर नोकरीवर असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याने कंपनीत कितीही दिवस काम केले असले तरीही तो Gratuity मिळ्वण्यासाठी पूर्ण हक्कदार असतो. मात्र, ज्या कंपनीमध्ये 10 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात तिथेच ग्रॅच्युइटी मिळेल हे देखील लक्षात असू द्यात. त्याविषयीचे अधिक तपशील पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, 1972 अंतर्गत देण्यात आले आहे.

Gratuity - Taxation, Limits, Formula & Calculation - IndiaFilings

आधीच नोकरी सोडल्यास होईल नुकसान

सध्याच्या काळात अनेक कारणांमुळे लोकं सतत आपली नोकरी बदलतात.अनेक लोकं चांगल्या संधी आणि पगारासाठी कंपनी सोडतात. मात्र आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या 1-2 वर्षात असे केले तर आपले तितके नुकसान होणार नाही. मात्र, जर आपण चौथ्या वर्षानंतर कंपनी सोडत असाल तर ते खूप मोठ्या नुकसानीचे ठरेल. कारण आता आपण Gratuity च्या खूप जवळ आला असाल. हे लक्षात घ्या कि, कंपनीकडून आपल्या पगारातून ग्रॅच्युइटीचा काही भाग कापला जातो. याचा अर्थ असा की, आपण कष्टाने कमावलेल्या पैशाचा एक भाग 4 वर्षांच्या अगदी जवळ जाऊन सोडून देता.

The Rule of Gratuity Payment in India

रक्कम कशी मोजली जाते ???

Gratuity मोजण्याचे एक निश्चित सूत्र आहे. ते पुढीलप्रमाणे आहे- एकूण ग्रॅच्युइटी रक्कम = (अंतिम सॅलरी) x (15/26) x (कंपनीत किती वर्षे काम केले). समजा एखाद्याने त्याच कंपनीत 20 वर्षे काम केले असेल. त्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार 75,000 रुपये असेल (बेसिक सॅलरी आणि महागाई भत्त्यासह). येथे महिन्यात फक्त 26 दिवस मोजले जातात, कारण 4 दिवस सुट्टी मानली जाते. त्याचबरोबर ग्रॅच्युइटीची गणना वर्षामध्ये 15 दिवसांच्या आधारे केली जाते. ग्रॅच्युइटीची एकूण रक्कम (75000) x (15/26) x (20) रुपये 8,65,385 आहे – अशा प्रकारे एकूण ग्रॅच्युइटीची रक्कम 8,65,385 रुपये होईल. जी कर्मचार्‍यांना दिली जाईल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://clc.gov.in/clc/sites/default/files/PaymentofGratuityAct.pdf

हे पण वाचा :
EPF खात्यामध्ये नॉमिनी नसेल तरीही कुटुंबाला अशा प्रकारे मिळवता येतील पैसे
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Train Cancelled : रेल्वेकडून 291 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव