नियमित गाड्या कधी सुरू होतील? रेल्वेने दिली संपूर्ण माहिती

Railway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोदकुमार यादव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, नियमित गाड्या सुरू होतील तेव्हा नवीन टाइम टेबल येईल. कोरोनाची परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत नवीन टाइम टेबल सादर केले जाणार नाही. नियमित गाड्या कधी धावतील हे आत्ताच सांगता येणार नाही. कोविड 19 या साथीच्या आजारामुळे रेल्वेने 22 मार्च पासून सर्व नियमित प्रवासी रेल्वे सेवेवर बंदी घातली आहे. मात्र, मागणी आणि आवश्यकतानुसार रेल्वे सध्या देशभरात नियमितपणे 300 हून अधिक खास मेल / एक्स्प्रेस गाड्या चालवीत आहेत. 12 सप्टेंबरपासून आतापर्यंत 80 अतिरिक्त गाड्याही सुरु केल्या गेल्या असून त्यांना क्लोन ट्रेन असे नाव देण्यात आले आहे. तसेच IRCTC ने 17 ऑक्टोबरपासून खासगी ‘तेजस’ गाड्याही पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. कोविड १९ या साथीच्या आजारामुळे तेजसची लखनऊ-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई सेवा 7 महिन्यांपूर्वी थांबविण्यात आली होती. या व्यतिरिक्त, अलीकडेच रेल्वे मंडळाने विविध झोनसाठी 39 नवीन गाड्यांना मान्यता दिली आहे. मंजूर झालेल्या सर्व 39 गाड्या या AC असतील.

पॅसेंजर गाड्यांचा महसूल कमी होण्याचा अंदाज – रेल्वेचे अध्यक्ष व्ही.के. यादव म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मालवाहतुकीचा महसूल जास्त असेल. मात्र पॅसेंजर रेल्वेचा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत कमी असू शकेल. तसेच, एकूण उत्पन्न वाढविण्यासाठी खर्चही कमी केला जातो आहे.

20 ऑक्टोबरपासून धावणार 392 गाड्या – भारतीय रेल्वेने सणांच्या दृष्टीने 196 जोड्या म्हणजेच 392 स्पेशल गाड्यांची लिस्ट जाहीर केली आहे. या महोत्सवासाठी स्पेशल गाड्या 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान धावतील. रेल्वे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, आगामी उत्सवाच्या हंगामात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. दुर्गापूजा, दसरा, दिवाळी, छठ पूजा या काळातील मागणीला जास्त महत्त्व देण्यासाठी कोलकाता, पाटणा, वाराणसी, लखनऊ इत्यादी ठिकाणांदरम्यान या फेस्टिव्हल स्पेशल गाड्या धावतील.

रेल्वे बोर्डाने सांगितले की, या गाड्या ताशी किमान 55 किलोमीटर वेगाने धावतील. त्यांच्या भाड्यांबाबत रेल्वेचे म्हणणे आहे की, भाडे बाकीच्या स्पेशल गाड्यांसारखेच असेल. या फेस्टिव्हल स्पेशल गाड्या केवळ 30 नोव्हेंबरपर्यंत धावतील. या गाड्यांसाठी तिकिट बुकिंगची सुविधा ऑनलाइन (IRCTC वेबसाइटवरून) आणि PRS तिकिट काउंटर्सवर उपलब्ध आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.