शेअर बाजार कोसळल्यावर आपला पैसा जातो कुठे?? जाणून घ्या नेमकं गणित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाल्याच्या बातम्या अनेकदा समोर येतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे की बुडालेला हा पैसा कोणाकडे जातो. तुमचे झालेले नुकसान नफा म्हणून दुसऱ्याला जाते का? याचे उत्तर आहे नाही, हा पैसा गायब होतो. होय, तुम्ही बरोबर वाचले आहे आणि ही बातमी तुम्हाला बाजाराच्या पडद्यामागे काय काय घडते याची संपूर्ण माहिती देईल.

वास्तविक, शेअरचे मूल्य त्याच्या कंपनीच्या कामगिरीवर, तोटा आणि नफ्याचे मूल्यांकन यावर अवलंबून असते. जर गुंतवणूकदार आणि बाजार विश्लेषकांना वाटत असेल की, एखादी कंपनी भविष्यात चांगली कामगिरी करू शकते, तेव्हा तिच्या शेअर्सची खरेदी वाढते आणि बाजारात तिची मागणीही वाढते. त्याचप्रमाणे, एखाद्या कंपनीला भविष्यात नफा कमी होईल किंवा व्यवसायात मंदी येईल असे भाकीत केले गेले तर तिच्या शेअर्सचा खेळ बिघडतो आणि कमी किमतीत विक्री सुरू होते. कारण, बाजार मागणी आणि पुरवठा या सूत्रावर काम करतो. त्यामुळे, दोन्ही प्रकरणांमध्ये शेअर्सचे मूल्य वर किंवा खाली जाते.

दुसऱ्या पद्धतीने समजून घ्या
बाजारात खरा पैसा नसतो आणि शेअरचे मूल्य हे त्याचे मूल्यांकन असते. जर आज तुम्ही 100 रुपयांना शेअर खरेदी करत असाल आणि दुसऱ्या दिवशी कंपनीचे मूल्यांकन बदलले ज्यामुळे शेअरचे मूल्यांकन 80 रुपयांपर्यंत खाली आले. आता हे शेअर्स विकल्यावर तुम्हाला 20 रुपयांचा तोटा झाला आहे, मात्र जी व्यक्ती ते खरेदी करेल त्याला थेट फायदा मिळणार का ? होय, जर त्या शेअरचे मूल्यांकन पुन्हा 100 रुपये झाले, तर ते विकून 20 रुपये नफा नक्कीच होईल.

बाजार भावना कशी काम करते?
शेअर बाजार हा भावनेचा खेळ आहे, असे म्हणतात. याचा अर्थ असा की, शेअरची किंमत गुंतवणूकदारांच्या भावनांनुसार ठरवली जाते. उदाहरणार्थ- एखाद्या कंपनीने कॅन्सरचे औषध बनवण्यासाठी पेटंट घेतले असेल तर भविष्यात त्याचा व्यवसाय आणि कमाई नक्कीच वाढेल असे गुंतवणूकदारांना वाटते. या विश्वासापोटी तो कंपनीचे शेअर्स खरेदी करू लागतो. बाजारात त्याची मागणी वाढली की, भाव वाढू लागतात. म्हणजेच, कंपनीबद्दलच्या अशा समजूतीमुळे तिचे मूल्यांकन अचानक वाढते. याला Implicit Value असे म्हणतात, तर कंपनीचे वास्तविक मूल्य तिच्या एकूण भांडवलामधून दायित्वे वजा करून निश्चित केले जाते. याला Explicit Value म्हणतात.

7 दिवसांत 17.23 लाख कोटी रुपये बुडाले, याचा अर्थ काय?
बाजारातील सततच्या घसरणीमुळे गेल्या 7 व्यापार दिवसांत गुंतवणूकदारांचे 17.23 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. म्हणजे कुणाच्या खिशात जाण्याऐवजी कंपन्यांचे मूल्यांकन कमी झाल्याने हा पैसा हवेतच विरला. BSE वर लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 17 जानेवारी रोजी 280.02 लाख कोटी रुपये होते, जे 25 जानेवारी रोजी 262.78 लाख कोटी रुपयांवर आले.

Leave a Comment