सेकंड हॅण्ड गाडी विकत घेण्यासाठी ‘या’ बँका देतायत स्वस्तात लोन! जाणून घ्या व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोरोना महामारीमुळे अनेक लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी केला आहे. यामुळे लोक नवीन चारचाकी वाहन घेत आहेत. पण मध्यमवर्गीय लोकांना लगेचच नवीन कार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक लोक हे सेकंड हॅण्ड गाडी घेण्याचा निर्णय घेत आहेत. सेकंड हॅण्ड गाड्यांवर बँक 5 लाखांपर्यंतचे लोन 5-7 वर्षांसाठी देत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांचे स्वप्न साकार होऊ शकणार आहे.

बऱ्याच बँका या 5 लाखांपर्यंत कर्ज देत आहेत. त्याच ठिकाणी काही बँक ह्या 7 लाखांपर्यंत कर्ज देत आहेत. यामध्ये 20 बँका 5 लाखांपर्यंत लोन देत आहेत. सेकंड हॅण्ड गाडी ही 5 लाखापर्यंत चांगल्या प्रकारे मिळू शकते. यामध्ये सर्वात कमी व्याज हे कॅनरा या बँकचे असून ते 7.5% टक्के इतके आहे तर सर्वात जात व्याज हे ॲक्सिस बँकेचे असून ते 14 टक्के इतके आहे. 7.5 ते 14 टक्के व्याजामध्ये 18 बँका आहेत. जर आपण सेकंड हँड कारसाठी बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कोणत्या बँकेत तुम्हाला सर्वात कमी व्याज दराने कर्ज मिळू शकते हे आपणास प्रथम माहित असणे आवश्यक आहे. यासह काही बँका 3 ते 5 वर्षांसाठी सेकंड हँड कार खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करुन देत आहेत. त्याच वेळी, काही बँका आहेत 7 वर्षापर्यंत कर्ज देत आहेत. म्हणूनच, जेव्हा आपण सेकंड हँड कार खरेदीसाठी कर्ज घेता तेव्हा कर्ज घेण्यापूर्वी सर्व माहिती जाणुन घ्या.

आम्ही आपल्यासमोर सर्व बँकांचा व्याज दर सादर केला आहे. सर्व बँकांच्या वेबसाइटवरून आम्ही सदर माहिती घेतली आहे. आम्ही कार कर्जासाठी बँक फी आणि कर्जासाठी प्रक्रिया शुल्क जोडले नाही. अशा परिस्थितीत बँकांच्या अटी व शर्तीनुसार हे व्याज दर थोडे बदलू शकतात. म्हणूनच, कार कर्ज घेण्यापूर्वी, आपण सर्व आवश्यक माहिती गोळा करणे आवश्यक आहे.

Leave a Comment