निळे आधार कार्ड कोणाकोणाला मिळते ? काय आहे त्याची वैधता? चला जाणून घेऊया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आधार कार्ड ही आता प्रत्येक भारतीयाची ओळख बनली आहे. सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असो किंवा पासपोर्ट वगैरे घ्यायचा असो यासारखी अनेक कामे आता आधार कार्डाशिवाय शक्य होणार नाही. त्यावर लिहिलेला 12 अंकांचा विशेष क्रमांक वगळता सर्वांचे आधार कार्ड एकसारखेच असते. मात्र, UIDAI मुलांसाठी जारी केलेल्या आधार कार्डचा रंग निळाच ठेवते.

UIDAI 5 वर्षाखालील मुलांसाठी बाल आधार कार्ड जारी करते. ते इतर आधार प्रमाणेच असते मात्र आता त्याचा रंग बदलून निळा झाला आहे. कोणतेही पालक व्हॅलिड कागदपत्रे देऊन आपल्या मुलांचे आधार कार्ड मिळवू शकतात. UIDAI आधार बनवण्यासाठी 31 प्रकारचे आयडेंटिटी प्रूफ, 44 प्रकारचे एड्रेस प्रूफ, 14 प्रकारचे रिलेशनशिप प्रूफ आणि 14 प्रकारचे बर्थ सर्टिफिकेट स्वीकारते. जर तुम्हालाही आपल्या मुलांसाठी आधार कार्ड बनवायचे असेल, तर तुम्ही या कागदपत्रांसह UIDAI च्या व्हॅलिड सेंटरवर अर्ज करू शकता.

मुलांसाठीच्या आधार कार्डची विशेष वैशिष्ट्ये
> मुलाचे वय पाच वर्षे पूर्ण होताच हे आधार कार्ड इनव्हॅलिड होईल.
> आधार तयार करण्यासाठी मुलाचा शाळेचा आयडी देखील वापरला जाऊ शकतो.
> मुलाचे वय 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, त्याचा biometric Aadhaar data अपडेट करा, तो 15 वर्षांचा झाल्यावर पुन्हा अपडेट करणे आवश्यक आहे.
> मुलाचे आधार बनवण्यासाठी हॉस्पिटलमधून बर्थ सर्टिफिकेट किंवा डिस्चार्ज स्लिप पुरेसे आहे.
> पाच वर्षापर्यंत बनलेल्या आधारमध्ये मुलाचे बोटांचे ठसे आणि डोळे स्कॅन केले जात नाहीत.
> UIDAI द्वारे ज्येष्ठांसाठी जारी केलेल्या आधार कार्डचा रंग लहान मुलांपेक्षा वेगळा असतो. पाच वर्षांनंतर ते अपडेट करणे आवश्यक आहे, कारण पाच वर्षांनंतर मुलांचे आधार कार्ड इनव्हॅलिड ठरणार आहे.

Leave a Comment