हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप उडाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे फडणवीसांच्या सरकार मध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले असून आजच त्यांनी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ आमदार असून यामधील अन्य ८ जणांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
राष्ट्रवादीच्या कोणकोणत्या नेत्यांना मंत्रीपदे भेटली
१) अजित पवार
२) छगन भुजबळ
३) दिलीप वळसे पाटील
४) मंत्री हसन मुश्रीफ
५) धनंजय मुंढे
६) धर्मरावबाबा आत्राम
७) अदिती तटकरे
८) संजय बनसोडे
९) अनिल पाटील
दरम्यान, अजित पवारांच्या या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा नाही. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपमध्ये जाणार किंवा सरकारमध्ये सामील होणार अशा चर्चा सुरु होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसककडून प्रत्येक वेळी या चर्चांचे खंडन करण्यात आलं. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच २ गट पडल्याचे सिद्ध झालं आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांचे निकटवर्गीय म्हंटल जाते ते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ या नेत्यांनीही अजित पवारांची साथ दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट झालं आहे.