हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं सत्तानाट्य काल भाजप- शिंदेंचे सरकार आल्यानंतर संपुष्टात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे आता विरोधी पक्षनेता कोणत्या पक्षाचा होणार याची चर्चा सुरु आहे. शिंदे गटातील आमदारांची संख्या पाहता आता सर्वाधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. राष्ट्रवादीकडे ५३, काँग्रेस कडे ४४ आणि शिवसेनेकडे १६ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे निश्तितच विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येईल.
पण, नेत्यांची फौज असलेल्या राष्ट्रवादीतुन विरोधी पक्षनेतेपद कोणाच्या गळ्यात पडेल याकडे सर्वांचे लक्ष असेल. भाजपसारखा तुल्यबळ सत्ताधारी पक्ष, देवेंद्र फडणवीसांसारखा अभ्यासू नेता आणि शिंदे गटातील बंडखोर नेत्यांनी त्यांना दिलेली साथ या सर्वांवर मात करायची असेल आणि पुन्हा एकदा राज्यात सत्तेत यायचं असेल तर मजबूत विरोधीपसक्ष असणं महत्त्वाचे आहे. चला जाणून घेऊया, विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागू शकते.
१) अजित पवार-
महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. सभागृहातील आपल्या आक्रमक भाषण शैलीमुळे सत्ताधारी भाजपला घायाळ करण्याचे कसब अजितदादांकडे आहे. विरोधी पक्षनेता असंण किती महत्त्वाचे आहे हे फडणवीसांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे अजित पवार हे पद स्वीकारणार का हे पाहावं लागेल.
२) जयंत पाटील-
अजित पवार यांच्यानंतर विरोधी पक्षनेते पदी कोणाची वर्णी लागू शकते तर ते जयंत पाटीलच असू शकतात. जयंत पाटील यांचा मूळ स्वभाव आक्रमक नसला तरी त्यांची अभ्यासू वृत्ती आणि त्यांना प्रत्येक गोष्टीतील असलेले सखोल ज्ञान भाजपला जेरीस आणू शकतात. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू अशी जयंत पाटील यांची ओळख आहे. २०१९ विधानसभा निवडणुकीपूर्वी जवळचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जात असताना जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत शरद पवारांसोबत संपूर्ण महाराष्ट्राभर प्रचारसभा घेतल्या. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी जयंत पाटील यांचेही नाव समोर येऊ शकते.
३) जितेंद्र आव्हाड-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या ठाण्यातून निवडून येतात त्याच ठाण्यातील दुसरे दिग्गज नेते म्हणजे जितेंद्र आव्हाड. शरद पवारांचे एकनिष्ठ अशी त्यांची राज्यभर ओळख आहे. भाजपच्या आक्रमक पणाला त्याच आक्रमणकपणे प्रत्युत्तर द्यायला जितेंद्र आव्हाड काफी आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना बळ देऊन त्यांना विरोधी पक्षनेते करणे हि सुद्धा राष्ट्रवादीची मोठी खेळी ठरू शकते.
4) छगन भुजबळ-
शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले छगन भुजबळ यांचेही नाव विरोधी पक्षनेतेपदी येऊ शकते. छगन भुजबळ याना प्रचंड राजकीय अनुभव आहे. भुजबळांनी यापूर्वी देखील विरोधी पक्षनेतेपद चांगल्या प्रकारे भूषवलं असून त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदाच होईल. भुजबळ हे सुद्धा शरद पवार यांच्या विश्वासातील आहेत