हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर NCB विरुद्ध नवाब मलिक असा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातच आता नवाब मलिकांनी एक ट्विट करता सूचक इशारा दिला आहे. कोण आहे फ्लेचर पटेल? त्याचा एनसीबी आणि त्यापैकी एका अधिकाऱ्याशी काय संबंध आहे? याबाबतचा तपशील लवकरच येथे उघड करेन असं सांगत मलिकांनी फ्लेचर पटेलचा एक फोटो ट्विटमध्ये जोडला आहे या फोटोत एक महिलाही दिसत आहे. नेमकं हा व्यक्ती कोण याची उत्कंठा सगळ्यांना लागली आहे. फ्लेचर पटेल हा NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या ओळखीतला असल्याचं म्हटलं आहे.
यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबी वर पुन्हा एकदा आरोप केलेत. फ्लेचर पटेल हा समीर वानखेडे यांचा फॅमिली फ्रेंड आहे. ते वानखेडेंच्या पब्लिसिटीसाठी कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यांचे फोटोही मी ट्विटरवर टाकले आहेत. साधारणपणे एखादा गुन्हा घडतो तेव्हा आजबाजूच्या लोकांना बोलावून पंचनामा केला जातो. माझ्याकडे पंचनाम्याचे फोटो आहेत. फ्लेचर पटेलने कोणते कार्यक्रम आयोजित केले ते फोटो ट्विटरवर टाकले आहेत. माय सिस्टर लेडी डॉन त्यांचेही फोटो टाकले आहेत, असं मलिक म्हणाले.
गेल्या एक वर्षातील माहिती घेतली असता एनसीबीने तीन केसेसमध्ये स्वतंत्र पंच म्हणून फ्लेचर पटेल यांचं नाव आहे. याचा अर्थ स्वतंत्र पंच यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. ही कारवाई ठरवून केली असल्याचं हे यातून स्पष्ट होत आहे. कोर्टाने अनेकदा स्वतंत्र पंच अनेक केसमध्ये असल्यास यात तथ्य नाही असा निष्कर्ष काढला आहे. याचा अर्थ एनसीबीच्या माध्यमातून फर्जीवाडा सुरु आहे,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.