हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी (High Court on Parambir Singh Appeal) केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीला मुंबई हायकोर्टाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh resigned) हे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. हायकोर्टाच्या आदेशामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. अखेर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याबद्दल घोषणा केल्यानंतर देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. च्या देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता हे खात जयंत पाटील कि दिलीप वळसे पाटील, अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यापैकी कोणाकडे जाणार? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता गृहमंत्रीपदि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच दिलीप वळसे पाटील यांच्य नावे समोर आली आहेत. यांच्यापैकी कोणाकडे गृह मंत्रालयाची धुरा सोपवली जाही याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. अनिल देशमुख यांची उचलबांगडी होण्यासाठी सर्वात मोठं कारण म्हणजे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आहे. या पत्रात परमबीर सिंगांनी गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. या गंभीर आरोपामुळे देशमुखांचा पाय खोलात आहे.
मुख्यमंत्रिपदानंतर सर्वात महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या खात्याचा कारभार, त्यांच्याकडे देणं योग्य नाही, त्यामुळे त्यांना हटवून गृह खात्याचा अनुभव असलेल्या जयंत पाटील यांच्याकडे हे खातं सोपवलं जाण्याची शक्यता आहे. कारण मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या गृहमंत्रिपदावर वीज कोसळली होती. त्यावेळी डिसेंबर 2008 मध्ये जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला होता. त्यानंतर जवळपास वर्षभर जयंत पाटलांनी ही धुरा सांभाळली. म्हणजेच संकटकाळात गृह मंत्रिपदाचा भार सहन करण्याची ताकद जयंत पाटलांकडे दिसते. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वरिष्ठतेच्या पातळीनुसार विचार केल्यास अजित पवारांनंतर जयंत पाटील यांचं नाव वरच्या स्थानी आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा भार अजित पवारांकडे आहे. त्यामुळे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जयंत पाटील, अजित पवार रेसमध्ये अग्रेसर मानले जातात.