हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यापासून विरोधकांकडून अनेक मोठमोठे आरोप केले जात आहेत. सत्ताधारी आघाडीच्या मंत्र्यांकडून घेतल्या जात असलेल्या निर्णयाचा बारकाईने तपास करून त्यात काही घोटाळा तर नाही ना हे भाजपच्या अनेक आमदारांकडून पहिले जात आहे. आज भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईतील मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधकामाच्या विषयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काही सवाल उपस्थित केले. मनोरा निवासाच्या पुनर्बांधणीचा वाढीव ३०० कोटींचा घपला कोणाचा? असा गंभीर सवालही भातखळकर यांनी विचारला आहे.
आमदार भातखळकर यांनी आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. आमदार भातखळकर यांनी त्याबाबतचा व्हिडिओही शेअर केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना त्यांनी विचारणा केली आहे कि, मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचा वाढीव ३०० कोटींचा घपला कोणाचा? मनोरा आमदार निवासाचे ६०० कोटींचे कंत्राट रद्द करून ते तब्बल ९०० कोटींवर नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून केले जात असून केवळ २ वर्षाच्या कालावधीत हा खर्च तब्बल ६६ टक्क्यांनी कसा वाढला? त्याबाबत त्यांनी खुलासा करावा. तसेच आमदार निवासाच्या कामाचे कंत्राट तात्काळ रद्दही करावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचा वाढीव ३०० कोटींचा घपला कोणाचा?
मनोरा आमदार निवासाचे ६०० कोटींचे कंत्राट रद्द करून ते तब्बल ९०० कोटींवर नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून केले जात असून केवळ २ वर्षाच्या कालावधीत हा खर्च तब्बल ६६ टक्क्यांनी कसा वाढला? pic.twitter.com/4eCSEZdnN8— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 7, 2021
आमदार भातखळकर यांनी याबाबत म्हंटल आहे कि, मनोरा या आमदार निवासाच्या वाढीव खर्चाची तसेच सम्पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेची आहे. या प्रकरणाची आपण अनेकांकडे तक्रार करणार आहोत. या प्रकरणाची विशेषतः मुख्य दक्षता आयुक्तांकडेही तक्रार करून त्यांनी याबाबत योग्य तपास करावा. अशी करणार आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर ६०० कोटींच्या कामावर ३०० कोटींचं फिनिशिंग कसे काय होऊ शकते? हे समोर येईल व यात जर मोठा घोटाळा झाला असेल तर तोही बाहेर पडेल, असे भातखळकर यांनी सांगितलं आहे.