काय कारण आहे एसबीआय आणि इंडियन बँकेच्या एटीएममधून २ हजाराच्या नोटा निघणं झालं बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि इंडियन बँक यांच्या एटीएममधून २ रुपयांची नोटा का येत नाही? या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत महत्वाचा खुलासा केला. एसबीआय आणि इंडियन बँक दोन्ही सरकारी बँकांनी त्यांच्या एटीएममध्ये २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा टाकण्यासाठी बदल करण्यास सुरवात केली आहे. तसेच २ हजार रुपयाच्या नोटेचे सुट्टे करताना ग्राहकांना मोठी अडचण येत असल्यानं एसबीआय आणि इंडियन बँकेने ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा ग्राहकांना पुरवण्यासाठी आपल्या एटीएममध्ये बदल करण्यास सुरवात केली आहे.

सध्या देशात ७.४० लाख कोटी रुपयांच्या २ हजाराच्या नोटा चलनात आहेत. सध्या देशात १०० रुपयांच्या १९,६२४ दशलक्ष नोटा चलनात आहेत, ज्याचं मूल्य १.९६ लाख कोटी रुपये आहेत. याशिवाय ४२,७८४ कोटी रुपयांच्या ५० रुपयांच्या नोटा चलनात आहेत.अशी माहिती ठाकूर यांनी संसदेत दिली.

२ हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईचे आदेश सरकारने दिले आहेत का? या प्रश्नाच्या उत्तरात अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत सांगितले की, २ हजार रुपयांच्या नोटांचे मुद्रण थांबविण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला नाही. नोटांच्या छपाईचा निर्णय सरकार आरबीआयच्या सल्ल्यानुसार घेते जेणेकरून देशात वेगवेगळ्या चलनी नोटा शिल्लक राहतील.

दरम्यान, अलीकडेच समोर आलेल्या वृत्तानुसार सरकारने २ हजार रुपयांच्या नोटांचे मुद्रण थांबवण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे तर एका सरकारी बँकेने सर्व शाखांकडून २ हजार रुपयांच्या नोटा मागे घेतल्याचा दावा करण्यात आला असून ग्राहकांनी पैसे काढताना २ हजारांच्या नोटा न देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या दृष्टीने आज अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सविस्तर खुलासा करत सरकारने २ हजाराच्या नोटांची छपाई बंद कण्याचे आदेश दिले नसल्याचे सांगितले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment