यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?;फडणवीसांचा सोनियांना पत्राद्वारे सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देश एकीकडं कोरोना परिस्थितीशी झगडत असताना राजकीय नेत्यांची मात्र विविध मुद्द्यानवरून एकमेकांवर चिखलफेक सुरूच आहे. आता राज्यातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून फडणवीस यांनी काही मुद्द्यावर भाष्य केले असून “यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचं का आणि ते देशाने स्वीकारायचं का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे

त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की अगदी 13 मे चा रोजी आकडेवारीचा विचार केला तरी देशातील एकूण करुणा रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील रुग्णांचे प्रमाण ते 22 टक्के आहे जे सातत्याने 30 टक्के आणि त्याहून अधिक राहिले आहे. देशात झालेल्या एकूण मृत्यूमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण 31 टक्के तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण सुद्धा 14 टक्के आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या स्थितीचा विचार करता महाराष्ट्राची स्थिती दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थिती सुधारली तर केंद्र सरकारच्या मनावरील ताण कमी होईल आणि देशातील कोरोनाचा लढा अधिक ताकदीने लढत आहेत त्याच्याशी आपण सहमत असालच. असे म्हंटले आहे.

महाराष्ट्राला सर्वाधिक मदत

आज महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली जात आहे ज्यात 1.80 कोटी वॅक्सिन आठ लाखांहून अधिक रेमडीसीवीर, सतराशे पन्नास मेट्रिक टन ऑक्सिजन कितीतरी व्हेंटिलेटर , आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांचा समावेश आहे. असं असलं तरी काही लोकांना मोदींवर टीका करणं त्यांच्या राजकारणाचे अंतिम लक्ष वाटतं असं फडणवीस यांनी म्हटले आहे. भारतीय वक्सिनला नाकारणारा काँग्रेस पक्ष आज यावरच राजकारण करताना दिसून येतो आहे खरे तर लसीचे उत्पादन वाढते आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात 200 कोटी लसी उपलब्ध होणार आहेत. अर्थात भारतीय वॅक्सिनबाबतीत बाबतीत काँग्रेसचा विश्वास वाढतो ही अतिशय आनंदाची बाब आहे. या संकटात त्यावर राजकारण न करता काँग्रेस पक्ष एका रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका ठेवावी असे म्हणत “ये पब्लिक है सब जानती है”असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

राज्यातील सरकारला आणि काही माध्यमांना मुंबई म्हणजेच महाराष्ट्र असं वाटतं. आता समजा मुंबईची स्थिती पाहिली तरी येथे चाचण्या कमी, त्यातही रॅपिड अँटीजेनचे प्रमाण अधिक ठेऊन एक नवीन मॉडेल तयार करण्यात आले. करोनामुळे होणारे मृत्यू सुद्धा मोठ्या प्रमाणात लपविले जात आहेत. अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू या वर्गवारीचे राज्यातील अन्य जिल्ह्यांचे प्रमाण 0.8 टक्के असताना एकट्या मुंबईत ते 40 टक्के आहे. मुंबईत दरवर्षी सरासरी 88 हजार मृत्यू होतात. पण, 2020 या वर्षांत यात 20,719 मृत्यू वाढले. यातील 11,116 मृत्यू केवळ करोनाचे दाखविले. म्हणजे प्रत्यक्षात 9,603 करोना मृत्यू दडविले. गेल्यावर्षीचा हा क्रम याही वर्षी सुरूच आहे. आता यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

 

Leave a Comment