सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक सोबत का लग्न केले? जाणून घ्या खरे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने २०१० मध्ये पाकिस्तानचा अष्टपैलू शोएब मलिकची आपला जोडीदार म्हणून निवड केली. सानिया मिर्झाने आपल्या देशाची सीमा ओलांडून एका पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न का केले, हे तिने नुकत्याच एका मुलाखती दरम्यान उघड केले. सानिया मिर्झाने पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकर झैनाब अब्बास याच्याशी बोलताना सांगितले की,’ शोएब मलिकने तिला लग्नासाठी ज्या पद्धतीने प्रपोज केले होते ते खूप मजेशीर होते. त्यामुळे ती शोएबला नाही म्हणू शकली नाही.’

शोएब मलिकने सानिया मिर्झाला असे केले होते प्रपोज
झैनाब अब्बासशी बोलताना सानिया मिर्झा म्हणाली, ‘काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर शोएब मलिकने मला थेट विचारले की, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. शोएब म्हणाला की, मला भारतात यायचे आहे आणि तुझ्या घरच्यांना भेटायचे आहे. जर तुझे उत्तर होय असेल तर मला कळंव.’

सानिया मिर्झा पुढे म्हणाली, “शोएबच्या बोलण्यात मला बरेचसे सत्य दिसले. मला असे वाटले की त्यात कुठलाही देखावा नाही आहे. या त्याच्या खऱ्या भावना होत्या, ज्या त्याने माझ्याशी व्यक्त केल्या. सानिया म्हणाली की,’ शोएबची हि गोष्ट मला आवडली की तो देखावा करत नाही. त्याने मला गुडघ्यावर बसून प्रपोज केला नाही, जी त्याची स्टाईल नाही. शोएब मलिक खूप साधा आणि सरळ आहे. सानिया मिर्झाने या मुलाखतीत झैनब अब्बास यांना सांगितले की,’ तिला शोएब मलिकच्या एका सवयीचा तिरस्कार आहे. जेव्हा त्यांच्यात भांडण होते तेव्हा शोएब आपल्या मनातले तिला काहीच सांगत नाही, तो त्या स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवतो.

सानिया मिर्झाची मोडली होती एंगेजमेंट
शोएब मलिकच्या आधी सानिया मिर्झाच्या आयुष्यात सोहराब मिर्झा होता. सोहराब आणि सानिया हे बालपणीचे मित्र होते आणि दोघांनी २००९.साली एंगेजमेंट केली होती. मात्र, काही कारणांमुळे ही एंगेजमेंट मोडली गेली, त्यानंतर शोएब मलिक सानिया मिर्झाच्या आयुष्यात आला. दोघांनी एकमेकांना ५ महिने डेट केले आणि १२ एप्रिल २०१० रोजी दोघांनी लग्न केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment