हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पॅकेज केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांवरील करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी GST लादण्यात आल्याचे भारत सरकारचे महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले. ते म्हणाले कि, “या उत्पादनांद्वारे बरीच करचोरी केली जात होती, ज्याला रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच यासाठी काही राज्यांकडून तशी मागणी देखील करण्यात आलेली होती.”
ते पुढे म्हणाले की,” पॅकेजिंग केलेल्या खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारचा नसून जीएसटी परिषदेचा आहे. तसेच या संदर्भातील निर्णय देखील ‘फिटमेंट कमिटी’ कडून घेण्यात आलेला आहे. हे लक्षात घ्या कि, फिटमेंट कमिटीमध्ये केंद्र तसेच राज्यांचे अधिकाऱ्यांचा समावेश आहे, जे जीएसटीचे दर सुचवतात. बजाज पुढे असेही म्हणाले की,”राज्यांच्या मंत्र्यांच्या सहभागासह मंत्री गटाकडूनही (GoM) या उत्पादनांवर GST लादण्याची शिफारस केली होती, ज्यासाठी GST परिषदेकडूनही मान्यता मिळाली.”
हे जाणून घ्या कि,”18 जुलै 2022 पासून पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांवर पाच टक्के दराने जीएसटी लागू केला गेला आहे. विरोधी पक्ष यासाठी विरोध करत ते सर्वसामान्यांसाठी घातक असल्याचे सांगत आहेत. यावर, महसूल सचिव म्हणाले की,” जीएसटी परिषद जीएसटीशी संबंधित प्रकरणांमध्ये निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे आणि या समितीने पॅकेज केलेल्या उत्पादनांवर कर लावण्याबाबत एकमताने निर्णय घेतला आहे. जीएसटी समितीमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे.” यासोबतच बजाज म्हणाले कि, “जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक राज्यांमध्ये या जीवनावश्यक वस्तूंवर कर लावला जात होता. त्यांच्याकडून राज्यांना महसूल मिळत होता. मात्र जुलै 2017 मध्ये जीएसटी सिस्टीम लागू झाल्यानंतर ही प्रथा सुरू ठेवण्याची कल्पना करण्यात आली होती.”
चंदीगडमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या GST कौन्सिलच्या 47 व्या बैठकीत जीएसटी वाढीचे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्याच आठवड्यात एक लिस्ट शेअर करताना सांगितले की,” जर या यादीतील 14 वस्तू विना पॅकेजिंग विकल्या गेल्या तर त्यांच्यावर कोणताही जीएसटी लागू होणार नाही. या यादीमध्ये डाळी, गहू, बाजरी, तांदूळ, रवा आणि दही/लस्सी यांसारख्या दैनंदिन वापरातील महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश आहे. तसेच तृणधान्ये, तांदूळ, मैदा आणि दही यांसारख्या वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लावण्याचा देखील सरकारने निर्णय घेतला आहे. याचा बचाव करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की,”हा जीएसटी फक्त पॅकेजिंग केलेल्या आणि लेबल केलेल्या उत्पादनांवरच लागू आहे.”
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.gst.gov.in/
हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ खासगी बँकेने आपल्या बचत खाते आणि FD वरील व्याजदरात केले बदल !!!
Gold Price : गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजाराची स्थिती कशी होती जाणून घ्या
PNB कडून FD वरील व्याजदरात पुन्हा वाढ !!! नवीन दर तपासा