मुंबई । शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत घेतली, याच मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी आपल्या शैलीतील फटकारे लगावले आहेत. यावेळी भाजप नेत्यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार उद्धव ठाकरेंनी यावेळी घेतला. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसून ते निष्क्रिय असल्याची टीका भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर सतत होत आहे. या गोष्टीवरून मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरेंनी कोरोनावरील माहिती सांगतांना फडणवीस यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. “मी फिरत नाही घरी बसतो म्हणून अभ्यास होतो. अभ्यास न करता फिरणं आणि न फिरता अभ्यास करणं तुम्हाला काय पाहिजे तुम्ही ठरवा,” असा चिमटा त्यांनी फडणवीसांना काढला.
.. म्हणून मी फिरत नाही घरी बसतो
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढ आणि कोरोना संसर्गाबाबत संजय यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीत चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं कि, “मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील प्रादुर्भाव वाढतोय. तुम्ही या विषाणूच्या वागणुकीचा आलेख पाहिला तर एक गोष्ट लक्षात येईल की हा गुणाकार करत जातोय. जिथे पाहिली सुरुवात होते तिथे तो शिखरावर जातो. त्यानंतर तो कर्व्ह फ्लॅट होऊन कमी होतो. जिथे उशीरा सुरु होतो संसर्ग तिथे तो उशीरा शिखरावर जातो. या मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जिथे उशीरा सुरु झालं आहे तिथे तो उशीराने शिखरावर चालला आहे. त्यामुळे ही शहर आणि परिसर कालांतराने बाहेर पडतील,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी दिलेलं इतकं सविस्तर उत्तर ऐकून संजय राऊत यांनी, “हे उत्तर ऐकून तुम्हाला डॉक्टरेट मिळाली पाहिजे रिसर्चसाठी,” अशी प्रतिक्रिया दिली.
यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी, “मी तेवढा अभ्यास नाही केला तर मी मुख्यमंत्री राहून काय करु,” असं म्हटलं. राऊत यांनी, “या देशामध्ये करोनावरती इतक्या खोलवर अभ्यास करणारे मला तुम्ही एकमेव मुख्यमंत्री दिसत आहात,” अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांचे कौतुक केलं. या कौतुकावरुन मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. “मी फिरत नाही घरी बसतो म्हणून अभ्यास होतो. अभ्यास न करता फिरणं आणि न फिरता अभ्यास करणं तुम्हाला काय पाहिजे तुम्ही ठरवा,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी नोंदवली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”