भारताची स्वदेशी लस ‘Covaxin’ ला मान्यता का मिळाली नाही, WHO ने केला खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जिनिव्हा । वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) कडून इंडिया बायोटेकची लस COVAXIN ला मंजूरी मिळण्याचा कालावधी वाढत आहे. WHO ने शुक्रवारी सांगितले की,” या मंजुरी प्रक्रियेला कधीकधी जास्त वेळ लागतो.” WHO ने भारत बायोटेकच्या Covaxin ला अद्याप औपचारिक मान्यता दिलेली नाही.

WHO च्या आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक डॉ. माइक रेयान म्हणाले की,”सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगाला योग्य सल्ला दिला गेला पाहिजे, मग त्याला अजून एक किंवा दोन आठवडे लागले तरी चालेल.’

26 ऑक्टोबरपर्यंत लसींच्या आणीबाणी वापर सूची (EUL) मध्ये Covaxin जोडल्यास निश्चित उत्तर मिळेल का, असे रायन यांनाविचारण्यात आले. त्यापूर्वी, WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की,’WHO भारताच्या ‘भारत बायोटेक’ द्वारे उत्पादित Covaxin ला आणीबाणीच्या वापरासाठी लसींच्या लिस्टमध्ये ठेवण्याचा विचार करत आहे. त्यासाठी तांत्रिक सल्लागार गट 26 ऑक्टोबर रोजी एक बैठक आयोजित करेल.’

या आठवड्यात, WHO ने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की,’भारत बायोटेक कडून Covaxin या लसीसंदर्भात अतिरिक्त माहिती मिळवण्यास उत्सुक आहे. WHO ने ट्विट केले होते, ‘आम्हाला माहित आहे की कोविड -19 विरूद्ध आणीबाणीच्या लसींच्या लिस्टमध्ये Covaxin चा समावेश करण्यासाठी अनेक लोकं WHO च्या शिफारशीची वाट पाहत आहेत, मात्र आम्हाला घाई नाही. आम्ही एखाद्या उत्पादनाची शिफारस करण्यापूर्वी ते करू शकत नाही. आणीबाणीमध्ये वापरासाठी, ते सुरक्षित आणि प्रभावी आहे याची खात्री करण्यासाठी आम्हाला त्याचे संपूर्ण मूल्यांकन करणे आवश्यक आहे. ‘

त्यात असेही म्हटले होते की ‘भारत बायोटेक’ WHO ला नियमितपणे डेटा देत आहे आणि WHO च्या तज्ञांनी या डेटाचे पुनरावलोकन केले आहे आणि त्यांना आणखी माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.