दाऊद हे नाव मुस्लीमांचच का? मराठ्यांमध्येही दाऊद आहेत; दरेकरांचा अजब दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या शाळेतील दाखला दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा मुस्लीम असल्याचा आरोप केला होता. या दाखल्यात समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे मलिक यांनी अधोरेखित केले. यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वानखेडे कुटुंबियांची बाजू घेत दाऊद हे नाव मराठ्यांमध्ये ही असत असा दावा केला आहे.

प्रवीण दरेकर यांनी म्हंटल, नवाब मलिक यांनी जातीवाचक किंवा व्यक्तीगत राजकारण करू नये. दाऊद हे नाव केवळ मुस्लिमांचंच आहे का ? मराठ्यांमध्येही आहेत. तपास यंत्रणा, न्याय व्यवस्था कारवाई करेल. नवाब मलिक हवेत गोळीबार करतात,” असे प्रविण दरेकर म्हणाले.

एसटी कामगारांच्या संपावरून देखील त्यांनी भाष्य केले. पवार साहेब म्हणात चर्चेतून मार्ग काढा. पण चर्चा दिखाव्याची आहे. सरकारकडे ठोस ऊपाय नाही. मुद्यावर चर्चा नाही, केवळ बनाव केला जातोय. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काहीतरी तोडगा काढावा लागेल. पण सरकारने हा अहंकाराचा विषय केला आहे असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

Leave a Comment