काँग्रेस पक्षाचे चिन्ह हाताचा पंजाच का ? त्यासाठी ‘ही’ बातमी नक्की वाचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।इंग्रजांच्या काळात प्रसिद्ध ब्रिटिश अधिकारी अ‍ॅलन अ‍ॅक्तेनियन ह्युम यांच्या मार्गदर्शनाखाली १८८५ साली मुंबईतल्या एका संस्कृत भाषा शिकवल्या जाणाऱ्या शाळेत अधिवेशन सुरू झाले  आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना झाली.
व्योमेशचंद्र बॅनर्जी हे त्यावेळी काँग्रेसचे पाहिले अध्यक्ष झाले होते. त्यानंतर भारताच्या स्वतंत्र लढ्यात काँग्रेसने मोलाची कामगिरी बजावली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सारखा मान्यवर नेता असल्यामुळे काँग्रेस हा पक्ष आपले राजकीय अस्तित्व १९६८ सालापर्यंत एकपक्ष पद्धती सारखं टिकवून ठेवत होता. आता पक्ष म्हटला की पक्ष संघटना बांधावी लागते. पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेहमी काहीतरी पक्ष कार्यक्रम द्यायचा असतो. त्याचबरोबर विचारधारे पासून तर प्रतिकांपर्यंत सगळ्या गोष्टी अगदी लक्ष पूर्वक सांभाळाव्या लागतात.

काँग्रेसचा विचार केला तर स्वातंत्र्योत्तर भारतात निवडणूक लढवतांना ‘ गाय – वासरू ‘ हे चिन्ह काँग्रेसचे अधिकृत चिन्ह होते. पण इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केल्यानंतर मात्र परिस्थिती पालटली. लोकांना आणीबाणी पेक्षा संजय गांधी यांच्या पाच कलमी योजनेची प्रचंड भीती वाटू लागली होती. परिणामी आणीबाणी उठवल्यानंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा सपशेल पराभव झाला. आणि मोरारजीभाई देसाई यांचा नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले.

आणीबाणी काळात लोकांचा केलेला छळ आणि त्यातून लोकांचे झालेले प्रचंड हाल या सगळ्याच्या अभ्यासासाठी न्या.शाह आयोग गठित करण्यात आला. या आयोगासमोर साक्ष देताना अनेक काँग्रेसचे नेते इंदिरा गांधी यांच्या विरोधात साक्ष देत गेले. याचा परिणाम व्ह्यायचा तोच झाला. एकसंध असणारा काँग्रेस पक्ष दुभंगला. इंदिरा समर्थक काँग्रेस ( आय ) आणि विरोधक काँग्रेस ( एस ).
आणीबाणी आणि त्यानंतर झालेला पराभव या मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी इंदिरा गांधी देशभर फिरू लागल्या होत्या. त्या काळात इंदिरा गांधी यांनी कांची कामकोटीच्या शंकराचार्य यांची भेट घेतली. इंदिरा भेटायला गेल्या तेव्हा शंकराचार्य यांचे मौन व्रत सुरू होते. एक तास बसून राहिले तरीही शंकराचार्य काहीच बोलत नाही म्हणून नमस्कार करून इंदिरा बाहेर पडतील. तेव्हा अचानक शंकराचार्य यांनी आशीर्वादाचा हात उंच केला. आणि शंकराचार्यांचा याच हाताच्या पंजाच्या आशीर्वाद म्हणून स्वीकार करत इंदिरा यांनी पुढच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचे चिन्ह म्हणून ‘ हाताचा पंजा ‘ हे निवडणूक चिन्ह वापरले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.