हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Railway : भारतीय रेल्वे नेटवर्क हे आशियातील दुसरे तर जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. ट्रेनममधून प्रवास करणे सोयीचे असल्याने आजही देशातील लाखो लोकं दररोज रेल्वेनेच प्रवास करतात. तसेच बस आणि विमानापेक्षा स्वस्त देखील आहे. मात्र आपल्या रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यांच्या रंगाकडे कधी आपले लक्ष गेले आहे का ??? या डब्यांच्या विविध रंगांमागे काही खास कारण आहे. चला तर मग त्यविशायीची माहिती जाणून घेउयात…
हे जाणून घ्या कि, रेल्वेच्या डब्यांचा रंग आणि डिझाईनचेही वेगळे अर्थ आहेत. त्यांची खासियत लक्षात घेऊनच या डब्यांचे रंग आणि डिझाइन ठरवले जातात. रेल्वेकडून वेगवेगळ्या वर्गांच्या ट्रेनमध्ये वेगवेगळ्या रंगाचे डबे वापरले जातात. यासोबतच डब्यांचा रंग आपल्याला ट्रेनच्या वेगाविषयीची माहिती सांगतो. वेगवेगळ्या रंगांमुळे ट्रेन ओळखणे जरा सोपे होते. उदाहरणार्थ, शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस गाड्यांमध्ये आपल्याला लाल रंगाचे डबे दिसतील. तसेच हे डबे कोणत्या ठिकाणी बनवले जातात आणि त्यांची गुणवत्ता याबाबतच माहिती देखील रंग सांगतात. Indian Railway
हिरव्या आणि तपकिरी रंगाचे डबे
गरीब रथ सारख्या गाड्यांमध्ये हिरव्या रंगाचे डबे वापरले जातात. भारतीय रेल्वेने विविधता आणण्यासाठी या रंगाचा शोध लावला. या हिरव्या रंगावर अनेक प्रकारचे पेंटिंग्ज देखील केले जातात, ज्यामुळे हे डबे दिसायला आणखी आकर्षक दिसतात. दुसरीकडे छोट्या लाईनवर धावणाऱ्या मीटरगेज गाड्यांमध्ये तपकिरी रंगाचे डबे वापरले जातात. Indian Railway
लाल रंगाचे डबे
शताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये लाल रंगाचे डबे बसवले जातात. इतर डब्यांच्या तुलनेत ते खूपच हलके आहेत. ज्यामुळे ते हाय स्पीड ट्रेनमध्ये जोडले जातात. 2000 साली जर्मनीतून आणलेले हे डबे ताशी 160 ते 200 किमी वेगाने धावू शकतात. डिस्क ब्रेकमुळे ते आपत्कालीन परिस्थितीत लवकर थांबवता देखील येतात. Indian Railway
निळ्या रंगाचे डबे
भारतीय रेल्वेचे बहुतेक डबे हे निळ्या रंगाचे आहेत. या डब्यांना इंटिग्रल कोच असे म्हणतात. एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्यांमध्ये मुख्यतः हे डबे बसवले जातात. त्यांचे वजन जास्त असल्याने हे डबे ताशी 70 ते 140 किमी वेगानेच धावू शकतात. तसेच त्यांना थांबवण्यासाठी एअरब्रेकचा वापर केला जातो. Indian Railway
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indianrail.gov.in/
हे पण वाचा :
Bank of Baroda कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागले
Valentine’s Day च्या निमित्ताने आपल्या जोडीदाराला गिफ्ट करता येतील ‘हे’ 5 गॅजेट्स
Gold Price Today : सोने-चांदी झाले स्वस्त, पहा आजचे नवे दर
Multibagger Stock : ‘या’ नवरत्न कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावून गुंतवणूकदारांनी कमावले कोट्यवधी रुपये
Gold Car : दुबईच्या शेखसाठी सोन्याची गाडी कोण बनवते ??? त्यासाठी किती सोने लागते ??? जाणून घ्या त्याविषयीची माहिती