औरंगाबाद हादरलं! पत्नीच्या आत्महत्येची बातमी ऐकताच पतीचीही आत्महत्या

suicide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – पुन्हा एकदा आत्महत्येच्या (suicide) घटनेने औरंगाबाद हादरलं आहे. यामध्ये पत्नीच्या आत्महत्येची (suicide) बातमी समजताच पतीनेही आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या दोघांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?
हि घटना सिल्लोड तालुक्यातील घाटंब्री या ठिकाणी घडली आहे. यामध्ये जोडप्याने वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आपल्या आयुष्यचा शेवट केला आहे. विकास तायडे आणि सपना तायडे असे या आत्महत्या (suicide) करणाऱ्या जोडप्याचे नाव आहे. या दोघांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. सपनाने सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

यावेळी विकास हा कामानिमित्त सिल्लोड शहरात गेला होता. त्याला सपनाने आत्महत्या केली असल्याचे समजताच त्यानेदेखील अंबईजवळील बोरगाव येथील खेळण्या नदीच्या पुलावर गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. अजिंठा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या