नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पतीच्या मोबाईलमध्ये दुसरीचा फोटो पाहून एक महिला भडकली. यानंतर रात्री तिनं पती झोपलेला असताना त्याच्या डोक्यावर वार केला आणि नंतर कुऱ्हाडीनं वार करत त्याची हत्या केली. पतीची हत्या केल्यानंतर हि महिला रात्रभर तिकडेच बसून राहिली. दुसऱ्या दिवशी जेव्हा युवकाचे आजोबा घरी पोहोचले तेव्हा ही घटना उघडकीस आली. यानंतर पत्नीने पोलिसांत जात स्वतःला सरेंडर केलं आहे. ही घटना छत्तीसगडच्या कोरियामधील बैकुंठपूर ठाण्यामध्ये घडली आहे.
सारा पहाड पारा येथील निवासी भूपेंद्र राजवाडे यांचं दोन वर्षांपूर्वी मांजापारा येथील अनुराधासोबत लग्न झाले होते. या दोघांना एका वर्षाची मुलगीही आहे. मृत व्यक्ती रविवारी संध्याकाळी उशिरा बाजारातून परतला आणि जेवण झाल्यानंतर तो झोपी गेला. यादरम्यान अनुराधा त्याचा मोबाईल पाहत होती. इतक्यात मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेचा फोटो पाहून ती भडकली आणि तिने झोपलेल्या पतीची हत्या केली.
दुसऱ्या दिवशी जेव्हा युवकाचे आजोबा घरी आले तेव्हा त्यांना भूपेंद्रचा मृतदेह दिसला. त्याची पत्नी अनुराधा गायब होती. गावकऱ्यांनी सांगितलं, की अनुराधाला त्यांनी सकाळी गावातून बाहेर जाताना पाहिलं. अनुराधानं या हत्येनंतर घरातील रक्ताची डाग पुसून घेतले. भूपेंद्रच्या मृतदेहाला नवे कपडेही घातले. यानंतर ती संपूर्ण रात्र त्याच खोलीत थांबली आणि सकाळ होताच गावातून बाहेर गेली. भूपेंद्र सोलर फिटिंगचं काम करत असे. काही महिन्यांपासून तो जिल्ह्यातील बिहारपुरमध्ये राहून आपलं काम पाहत होता. यादरम्यान तो 15-20 दिवस घरीच जात नसे. याच कारणावरुन पती-पत्नीत अनेकदा वाद होत होते. या अगोदरदेखील मोबाईलमध्ये असलेल्या फोटोवरून दोघांमध्ये वाद झाला होता.