भाजपमध्ये प्रवेश करणार का? सचिन पायलट म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बंडखोर सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी केल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांनी भाजपासोबत मिळून सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. अशा वेळी सचिन पायलट भाजपमध्ये प्रवेश असल्याची शक्यता वर्तवली जात असताना खुद्द पायलट यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.

आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे. एएनआयने याबाबतचे वृत्त दिलं आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून बोलावण्यात आलेल्या विधिमंडळ पक्ष बैठकांना गैरहजर राहिल्याने सचिन पायलट यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सचिन पायलट यांच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या १८ जणांना नोटीस पाठवण्यात आली असून दोन दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आल आहे. अन्यथा विधिमंडळ पक्षाचं सदस्यत्व रद्द केलं जाणार आहे. राजस्थानमधील काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरुद्ध राजकीय संघर्षात सचिन पायलट यांना पक्षाने बाजुला केलं आहे. पण त्यांना अजून काँग्रेसने पक्षातून काढलेलं नाही. तर सचिन पायलट यांनी देखील पक्ष सोडण्याबाबत कोणतंही विधान केलेलं नाही. सचिन पायलटवर काँग्रेसच्या कारवाईनंतर पक्षाच्या अनेक नेत्यांनी यावर नाराजी दर्शवली आहे.

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ट्विट करत म्हटलं की, “मी सचिन पायलट यांना एक चांगला आणि प्रतिभावंत नेता मानतो. पक्षातून वेगा मार्ग काढण्यापेक्षा त्यांनी पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी दिशा देण्यासाठी काम केलं पाहिजे होतं. यामुळे त्यांचं, आमचं आणि सगळ्यांची स्वप्न पूर्ण झाली असती.” काँग्रेस नेते जितिन प्रसाद यांनी म्हटलं की, सचिन पायलट यांनी अनेक वर्ष समर्पण भावाने काम केलं आहे. आशा आहे की, परिस्थिती सांभाळली जावू शकते. पण दु:ख यांचं आहे की, परिस्थिती इतपर्यंत पोहोचली.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment