मोठी बातमी! यापुढे नाही करू शकणार 50 रूपयांपेक्षा कमीचे UPI व्यवहार; लवकरच बदलणार आहेत नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) युनिफाईड पेमेंट इंटरफेसयुपीआय) चैनल वर 50 रुपयांपेक्षा कमी करण्यात येणाऱ्या सर्व गेमिंग ट्रांजेक्शनवर पूर्णपणे बंदी लागू शकते. नवीन नियम या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे पाहून यूपीआयवरती गेमिंग इंडस्ट्रीच्यामार्फत करण्यात येणाऱ्या ट्रांजेक्शनला कमी करण्यासाठी उचलले गेल्याची चर्चा आहे.

करोना महामारीमुळे डिजिटल ट्रांजेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. बँकिंग क्षेत्राच्या कमी वापरामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळते. सद्ध्या आयपीएल मॅच दरम्यान गेमिंग मर्चंट्स यांच्या व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे अनेक तज्ञांना चिंता आहे की या लहान लहान ट्रांजेक्शनमध्ये होत असणाऱ्या वाढीमुळे सिस्टिम औटेजची समस्या वाढू शकते.

गेमिंग इंडस्ट्रीच्या तज्ञांच्यानुसार भविष्यामध्ये युपीआय चा उपयोग मोठ्या प्रमाणात कमी केला जाईल. गेमिंग इंडस्ट्रीनुसार लवकरच काही आठवड्यांसाठी यावर प्रतिबंध लावण्याचा विचार करत आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये असलेल्या तणावामुळे हे पाऊल उचलले जात असल्याचे चर्चेमध्ये पाहायला मिळते. युपीआय ट्रांजेक्शन वरती यापुढे कोणताही चार्ज लागणार नाही. गेमिंग मर्चंटच्या एका सोर्सने सांगितले की, युपीआय ट्रांजेक्शन हे गेमिंग ग्राहकांसाठी पाहिले पसंती असलेले ट्रांजेक्शन आहे. यामध्ये 50 टक्क्यापेक्षा जास्त ट्रांजेक्शन हे पन्नास रुपयापेक्षा कमी आहेत. जर हे बंद झाले तर गेमिंग इंडस्ट्रीसाठी हा मोठा झटका असणार आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.