हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. खबरदारी म्हणून राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केलं आहे. राज्य सरकार वारंवार नागरिकांना गर्दी न करण्याचं घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहे. मात्र, बरेच लोक अजूनही विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. गर्दी करताना दिसत आहेत. अशा वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनच्या काळात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
माध्यमाशी बोलताना जीत पवार म्हणाले,”इटली, अमेरिका, स्पेनमधील करोना बळींपासून धडा घेऊन जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन करोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कामगार यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. “करोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”