RSS राजकारणात उतरणार का? मोहन भागवत म्हणतात..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरएसएस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीची भारतीय जनता पक्षाच्या मार्गदर्शक म्हणून ओळखला जातो. आरएसएस भाजपची मातृसंघटना मानली जात असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेते संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहेत. त्यामुळे RSS सक्रिय राजकारणात कधी उतरणार असा प्रश्न सातत्याने विचारण्यात येतो?? याच पार्श्वभूमीवर संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी याबाबत स्पष्ट शब्दात सांगितले आहे. संघ कधीही सत्ताकारणात येणार नाही असं मोठं विधान त्यांनी केलं आहे. मोहन भागवत विदर्भ साहित्य संघाच्या शतक महोत्सवी वर्षा निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते.

संघ लोकप्रिय झाला तर लोक संघाकडे ही सत्ता सोपवायला मागे पुढे पाहणार नाहीत. मात्र, संघ तसे करणार नाही, म्हणजेच संघ कधीही सत्ताकारणात येणार नाही. कोणत्याही संघटनेला दीर्घकाळ कार्यरत राहायचे असल्यास त्या संघटनेतील नेते आणि कार्यकर्ते दोघांनी दक्ष राहून काम करणे गरजेचे असते. “स्टेटस आणि कन्फर्ट” या दोन गोष्टी कोणत्याही संघटनेसाठी आपत्ती ठरते. स्टेटसला प्रेम करणारा नेता आणि कंफर्टला प्राधान्य देणारे कार्यकर्तेच संघटनेचा बट्ट्याबोळ करतात, असे विचार मोहन भागवत यांनी मांडले.

“देश सक्षम झाला पाहिजे यासाठीच संघाचे प्रयत्न असतील. आपल्या देशासमोर असलेल्या आव्हानाचा सामना एकाच नेत्याला करायचा नाही. तो नेता किती ही मोठा असला तरी तो एकटा सर्व आव्हानांचा सामना करू शकत नाही. 1857 पासूनच देशाच्या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात झाली. त्यावेळी अनेक लोकं उभे राहिले, अनेकांनी बलिदान दिले, अनेकांचे आयुष्य खर्ची गेले. लोकांनी केलेले समर्पण हे व्यर्थ गेले नाही आणि त्यामुळे स्वातंत्र्य मिळाले असेही मोहन भागवत म्हणाले.