लोकांच्या आरोग्यसोबतच अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही आमचं लक्ष- पंतप्रधान मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनाच्या आजच्या संकटाच्या काळातही देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते इंडिया ग्लोबल विक या कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात व्हर्च्युअल कॉन्फरन्सिंगद्वारे देशाला संबोधित करत होते. सध्या देश करोना नावाच्या व्हायरससोबत लढतो आहे. मात्र भारत हा देश प्रत्येक संकटातून बाहेर पडला आहे. आपला इतिहास हेच सांगतो आहे. एकीकडे देश कोरोना नावाच्या जागतिक संकटाचा सामना करतो आहे. तर दुसरीकडे सरकार म्हणून आमचं लोकांच्या आरोग्यसोबतच अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही लक्ष आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत हा एक प्रतिभेचे पॉवरहाउस आहे जो दुसऱ्या देशांकडून काही शिकतो आणि इतरांना शिकवतो. भारताने अनेक क्षेत्रात चांगली प्रगती केल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, भारत ही जगातील सर्वात खुली अशी अर्थव्यवस्था आहे. आम्ही भारतात जगभरातील सर्व जागतिक कंपन्याचे स्वागत करतो. आज भारत अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध करून देत आहे. जगातील फारच कमी देश असे करत आहेत. भारतात कृषी क्षेत्रात झपाट्याने सुधारणा होत असून देशात या क्षेत्रातील गुंतवणुकीला चांगली संधी उपलब्ध असल्याचे पंतप्रधान पुढे म्हणाले.

आम्ही भारतात लघु आणि सूक्ष्म क्षेत्रातही सुधारणा केलेल्या आहेत. मोठे MSME क्षेत्र देखील मोठ्या उद्योगांसाठी पूरक असणार आहे. संरक्षण क्षेत्रात देखील गुंतवणुकीची संधी उपलब्ध झालेली आहे. आता, अवकाश क्षेत्रात देखील खासगी गुंतवणूक करता येणार आहे, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत भारताने जीएसटीसह एकूण वित्तीय समावेशन, हाउसिंग आणि पायाभूत सुविधा, इज ऑफ डूइंग बिझनेस, बोल्ड टॅक्स सुधारणा अशा क्षेत्रांमध्ये चांगले काम केले आहे, असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. या वेळी तंत्रज्ञानालाही धन्यवाद द्यावे लागतील. कारण त्यामुळे एक-एक पैसा थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. लोकांना मोफत स्वयंपाकाचा गॅस, बँकांच्या खात्यामध्ये पैसा, तसेच लाखो लोकांना मोफत अन्नही देता आले, असेही मोदी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment