औरंगाबाद – स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेला 31 मार्चपूर्वी 250 कोटी रुपयांचा वाटा करणे बंधनकारक होते. मनपा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपये मंगळवारी दिले. उर्वरित 100 कोटी लवकरच देण्यात येणार आहे. यापूर्वी मनपाने 68 कोटी रुपये स्मार्ट सिटी जमा केले. ही रक्कम मनपा परत घेणार असल्याची माहिती मुख्य लेखाधिकारी संतोष वाघुळे यांनी दिली.
केंद्र शासनाचे 500 कोटी राज्य शासनाचे 250 कोटी आणि महापालिका प्रशासनाचे 250 कोटी याप्रमाणे निधीचे स्वरूप ठरविण्यात आले. केंद्र शासनाने 500 कोटींपैकी 294 कोटी आणि राज्य शासनाने 250 कोटींपैकी 147 कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटी साठी प्रशासनाला आजपर्यंत उपलब्ध करून दिला आहे.
उर्वरित 309 कोटी रुपयांचा निधी महापालिकेने स्वतःचा वा टाकल्याशिवाय मिळणार नाही. अशी भूमिका केंद्र आणि राज्य शासनाने घेतली. स्मार्ट सिटी योजनेला 31 मार्च 2022 पर्यंत मुदत आहे.