नवी दिल्ली । बहुतेक लोकं जेव्हा त्यांना पैशांची गरज असते तेव्हा कर्जाचा मार्ग स्वीकारतात, मात्र जर तुम्ही पगारदार कर्मचारी असाल आणि तुम्ही दरमहा तुमच्या PF खात्यात पैसे जमा करत असाल तर कर्ज घेण्याऐवजी तुम्ही तुमच्या PF खात्यातून पैसे काढू शकता. EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना तुम्हाला तुमचे पैसे गरजेनुसार काढण्याचे स्वातंत्र्य देते.
नोकरी गेली किंवा कोणी दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार असेल तर PF खात्यातून पैसे काढता येतात. याशिवाय तुम्ही तुमचा भविष्य निर्वाह निधी आजारपण, मुलांचे शिक्षण ते घर बांधण्यासाठी वापरू शकता. मात्र जर तुमच्याकडे पैसे काढण्यासाठी ठोस कारण नसेल तर तुम्ही जास्त पैसे काढू शकणार नाही.
अशा प्रकारे PF खात्यातून पैसे काढा
1- UAN पोर्टलवर जा आणि लॉग इन करा. कॅप्चा एंटर करा आणि साइन इन करण्यासाठी पुढे जा.
2- आता वरच्या मेनूमध्ये दिसणार्या ‘Online Services’ टॅबवर जा आणि ‘क्लेम (फॉर्म 31, 19 आणि 10C)’ या पर्यायावर क्लिक करा.
3- हे तुम्हाला मेंबर डिटेल्स, kyc डिटेल्ससह नवीन पेजवर घेऊन जाईल. आता येथे तुमचा बँक खाते क्रमांक टाका आणि ‘Verify’ वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला PF Service सोडण्याचे कारण भरावे लागेल
4- ‘सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग’ नावाचा पॉप अप दिसेल. तेथे ‘Yes’ वर क्लिक करा.
5- पुन्हा ड्रॉप डाउन मेन्यूवर जा आणि ‘I want to apply for ‘ पर्याय निवडा आणि तेथून ‘Only PF Withrawal (फॉर्म 19)’ पर्याय निवडा.
6- ‘Complete Address’ विभाग भरा आणि तुमच्या पासबुकची किंवा चेकची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा.
असे PF Account ऑनलाइन ट्रान्सफर करा
>> सर्वप्रथम EPFO मेंबर पोर्टलवर लॉगिन करा.
>> यानंतर Online Services मध्ये गेल्यावर वन मेंबर वन अकाउंटवर क्लिक करून ट्रान्सफर रिक्वेस्टवर क्लिक करा.
>> सध्याच्या एम्प्लॉयमेंट साठी PF खाते आणि वैयक्तिक माहितीचे इन्फर्मेशन आवश्यक आहे.
>> Get Details वर क्लिक केल्यानंतर जुन्या एम्प्लॉयमेंटची तपशीलवार माहिती तुमच्या समोर उघडेल.
>> आता तुम्हाला प्रिव्हियस एंप्लॉयर किंवा करंट एंप्लॉयर यापैकी एक निवडावा लागेल आणि येथे तुम्हाला फॉर्म अटेस्ट करावा लागेल.
>> यानंतर, तुम्ही UAN मध्ये दिलेल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP मिळवण्यासाठी ‘Get OTP’ वर क्लिक करा.
>> विचारलेला OTP एंटर करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
>> तुम्ही फॉर्ममध्ये निवडलेल्या एंप्लॉयरने अटेस्ट केल्यानंतर EPFO तुमचे EPF Account ऑनलाइन ट्रान्सफर करेल.
>> खाते ट्रान्सफर केल्यावर, तुमचा नवीन एंप्लॉयर किंवा एंप्लॉयर भविष्य निर्वाह निधीची रक्कम तुमच्या त्याच EPF खात्यात ठेवण्यास सक्षम असेल आणि तुम्ही EPFO मेंबर पोर्टलवर देखील ते तपासू शकता.