हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्या पुढाकाराशिवाय मोदींविरोधात पर्याय निर्माण होऊ शकत नाही, असे महत्त्वाचे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं
संजय राऊत म्हणाले की, शरद पवार साहेब हे खूप मोठे नेते आहेत. आज देशातल्या विरोधी पक्षाला एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. देशातील विरोधी पक्ष एकत्र यावेत, समविचारी पक्ष एकत्र यावेत यासाठी नक्कीच काही भूमिका ठरतायत. आणि शरद पवार यांच्या सक्रिय सहभागाशिवाय या एकजुटीचे पाऊल पुढे जाणार नाही, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शरद पवारांशिवाय मोदींना पर्याय किंवा विरोधी पक्षाची एकजूट होऊ शकत नाही, हे माझे स्पष्ट मत आहे. देशामध्ये अनेक प्रमुख नेते आहेत मात्र, या आघाडीचे नेतृत्व करण्यात शरद पवारांनी करावे असे संजय राऊत यांनी म्हंटल
यावेळी त्यांनी मनसे आणि भाजपवर देखील जोरदार निशाणा साधला. कितीही असंतुष्ट आत्मे एकत्रं आले, महाराष्ट्राविरुद्ध, मराठी माणसांविरुद्ध कितीही कट कारस्थान केली, मुंबईविरुद्ध कट कारस्थानं केली तरी त्यांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही उभे राहू, असं संजय राऊतांनी म्हंटल .