संतापजनक ! भर बाजारात महिला वकिलाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

Banglore Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बंगळुरू : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पुरुष एका महिलेला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण (brutally assaulted) करताना दिसत आहे. यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या महिलेला मारहाण (brutally assaulted) होत असताना आजूबाजूची लोकं तमाशा पाहताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे. ही लाजिरवाणी घटना कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील विनायक नगर या ठिकाणी घडली आहे.

https://twitter.com/MdFasahathullah/status/1525510083504791552

काय आहे प्रकरण ?
संगीता शिक्केरी असे पीडित महिलेचे नाव असून ती पेशाने वकील आहे. तर आरोपीचे नाव महनतेश आहे. हे दोघे एकमेकांचे शेजारी आहेत. कोणत्या तरी मालमत्तेवरून त्यांच्यात वाद सुरू होता. यासाठी महनतेशने संगीता आणि तिच्या पतीला भरदिवसा मारहाण (brutally assaulted) केली. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ केवळ 9 सेकंदांचा आहे, परंतु यातील दृश्य खूपच क्रूर आणि भयानक आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी महनतेश संगीताला बेदम मारहाण करताना दिसत आहे.

या दरम्यान तो महिलेच्या पोटावर लाथही मारतो, त्यामुळे ती वेदनेने ओरडते आणि काही पावले मागे जाते. मात्र महनतेश इथेच थांबत नाही, तो संगीताला सतत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करतो. त्यानंतर तो तिला चापट मारू लागतो. या हल्ल्यादरम्यान महिलेच्या हातातील कागदपत्रंही खाली पडल्याचं पाहायला मिळत आहेत. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपी महनतेशला अटक केली आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र या व्यक्तीने पीडित महिलेला नेमकी कोणत्या कारणामुळं मारहाण केली याचा तपास पोलीस घेत आहेत.

हे पण वाचा :

ICICI Bank कडून ​​FD च्या व्याजदरात वाढ !!!

Home Loan : आता घर खरेदी करणे महागणार, LIC हाउसिंग फायनान्सकडून होम लोनवरील व्याजदरात वाढ

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सुरक्षा वाढविली; आता ‘या’ दर्जाची पुरवली जाणार सुरक्षा

औरंगाबादेत पाणीप्रश्न पेटला, मनपा आयुक्तांवर दोघांचा हल्ला, सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानामुळे आयुक्त बचावले; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

आमिरच्या मुलाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण; पडद्यामागे नव्हे तर पडद्यावर झळकणार ‘जुनैद’