हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंगणघाट येथे एका महिला प्राध्यापिकेला जाळून मारण्याच्या घटना ताजी असताना नाशिक जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकाच्या आवारात एका विवाहित महिलेवर पेट्रोल ओतून काही अज्ञात हल्लेखोरांनी तिला जाळण्याचा प्रयत्न केला. आज, शनिवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली आहे. बसस्थानकातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी चार अज्ञात संशयितांचा शोध सुरू केला असून एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकावर एक विवाहित महिला रसवंतीगृहाजवळ बसची वाट पाहत होती. त्यावेळी अचानक चार अज्ञात तरूणांनी अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवले. या दुर्देवी घटनेमध्ये महिला गंभीर भाजली आहे. सध्या तिला नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ बसस्थानकावर धाव घेत सीसीटीव्हीच्या फूटेजच्या आधारे तपासाला गती दिली आहे. या फूटेजच्या आधारे पोलिसांनी चार अज्ञात संशयितांचा शोध सुरू केला असून एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वी अशी दुर्देवी घटना घडल्यामुळे पोलिसांनी याकडे गांभिर्यानं घेतलं आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.