मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एका महिलेवर बलात्कार करून मग तिची गळा चिरून हत्या केल्याची घटना मुंबईतील वांद्रे कुर्ला परिसरात घडली आहे. कुर्ला कॉम्पलेक्स परिसरामधील MTNL जंक्शनजवळ हा महिलेचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात हे निर्घृण हत्येचे प्रकरण वाटतं होते. पण मृतदेहाच्या वैद्यकीय तपासातून वेगळाच खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहेत.
या महिलेचा मृतदेह वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स येथील MTNL जंक्शनजवळ मंगळवारी सकाळी सापडला. यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्या महिलेच्या मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत पडला होता. या महिलेची हत्या गळा चिरून केल्याचे वाटत होते पण जेव्हा मृतदेहाचा वैद्यकीय तपास करण्यात आला तेव्हा महिलेच्या गुप्तांगात जखमा झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मृत महिला देहव्यापार करणारी असू शकते तसेच पैशाच्या वादातून महिलेची हत्या केल्याचा अंदाज बीकेसी पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणामधील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. या प्रकरणाशी संबंधित अजून कोणताच पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही. या परिसरातील सगळे सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत.