दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाला; मृत्यूचं कारण अस्पष्ट

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यातील एका बेपत्ता महिलेचा मृतदेह तब्बल दोन दिवसांनी सापडला आहे. या महिलेनं शनिवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास वर्धा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार या महिलेचा शोध घेण्यात येत होता. अखेर आज या महिलेचा मृतदेह सापडला आहे.

घुग्गुस- वणी या मार्गावर असलेल्या वर्धा नदीच्या पुलावरून एका महिलेनं नदीत उडी घेतल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत विशेष बचाव पथकाद्वारे या महिलेचा शोध घेण्यात आला मात्र तिचा कुठेच पत्ता लागला नाही.

सोमवारी पुन्हा बचाव पथकाकडून आणि पोलिसांकडून महिलेला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता दुपारच्या सुमारास या महिलेचा मृतदेह नदीच्या घाटाजवळ आढळून आला. या महिलेचे नाव सौ. रविता जुनघरी असं आहे. या महिलेने आत्महत्या नेमकी कशामुळे केली हे अजूनही समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

You might also like