शरीरसंबंधासाठी पती भाग पाडत होता; यानंतर पत्नीने प्रियकरासोबत रचला कट

Love Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विवाहबाह्य संबंधांमधून एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उत्तराखडंमधील हरिद्वारमध्ये घडली आहे. या घटनेत महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन त्याच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी मृतदेह पूर्ण जाळण्याआधीच त्यांनी जंगलामधून पळ काढला. यामध्ये सर्वात धक्कादायक घटना अशी कि आरोपी महिलेने ११ मे रोजी हरिद्वारमधील पथरी पोलीस ठाण्यामध्ये तिचा पती संजीव बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हा पोलिसांना या महिलेच्या वागणुकीसंदर्भात शंका आली आणि त्यांनी तिची कसून चौकशी केली. जेव्हा पोलिसांनी आपला हिसका दाखवला तेव्हा तिने आपला गुन्हा कबुल केला. जेव्हा या महिलेने या प्रकरणाचा खुलासा केला तेव्हा पोलिसदेखील चक्रावले.

काय आहे प्रकरण ?
आरोपी महिलेची पती संजीवच्या माध्यमातून शेजारच्या गावामध्ये दूध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शिवकुमारशी ओळख झाली होती. हळूहळू या महिलेचे आणि शिवकुमारचे प्रेमसंबंध सुरु झाले. या प्रकरणाची माहिती जेव्हा संजीवला समजली तेव्हा संजीव या दोघांनाही त्याच्या उपस्थितीमध्ये शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडत असे. तसेच अनैसर्गिक पद्धतीने संबंध ठेवण्यासाठी संजीव आपल्या पत्नीवर दबाव आणत होता. एवढेच नाहीतर तो त्यांना ब्लॅकमेल करुन बदनामी करण्याची धमकीसुद्धा देत होता. अशी माहिती आरोपी महिलेने पोलिसांना दिली आहे.

दोन्ही आरोपाींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावली याची माहिती दिली. पोलिसांना जंगलामध्ये संजीवचा मृतदेह अर्धवट जाळालेल्या अवस्थेत सापडला. एकीकडे संजीव या दोघांच्या प्रेमामध्ये अडचण ठरत होता तर दुसरीकडे तो त्यांना समाजामध्ये बदनाम करण्याची धमक्या देत होता. या सगळ्या त्रासाला कंटाळून आरोपी महिला आणि शिवकुमारने संजीवचा काटा काढण्याचा कट रचला. एकाच वेळी तिघेजण शरीरसंबंध ठेवणार असल्याचे सांगून त्यांनी संजीवला भेटायला बोलवले व त्याची गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर त्यांनी संजीवचा मृतदेह एका गोणीमध्ये भरून तो जंगलात नेऊन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.