हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक स्त्रीला आपल्याला हवा असणारा जोडीदार किव्हा पुरुषाला असणारी हवी असणारी जोडीदार पाहिजे असते. आपल्या मनाप्रमाणे वागणारी, आपली काळजी घेणारी तसेच संकटाच्यावेळी पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी एखादीतरी व्यक्ती आयुष्यात असावी असे प्रत्येकाला वाटत असते. महिलांना किव्हा पुरुषांना अनेक गोष्टी आवडत असतात. त्यामध्ये गुड लुक्स (चांगले दिसणे) ही गोष्ट वरवर पाहिली तरी प्रत्येक पुरूष महिलेमध्ये आणि महिला पुरूषामध्ये पाहत असतात. मात्र, जेंव्हा एकत्रीत संसार सुरु होतो तेव्हा ‘या’ गोष्टी पुरूषांमध्ये असाव्यात, असे महिलांना वाटत असते. आज आंतरराष्ट्रीय पुरुषार्थ दिनानिमित्त आपण जाणून घेणार आहोत पुरुषांमधील महिलांना कोणते गुण भावतात ते…
1) सेन्स ऑफ ह्यूमर (विनोदबुध्दी)
महिलांना जास्त करून पुरुषांतील सर्वात महत्वाचा गन आवडतो तो म्हणजे आत्मविश्वासासोबतच चांगला सेन्स ऑफ ह्युमर म्हणजेच विनोद बुध्दी असलेले पुरूष आवडतात. कारण अशा पुरूषांसोबत असल्यावर त्यांना कंटाळा किंवा बोरींग वाटत नाही.अशा पुरुषांबरोबर महिला नेहमी आनंदी राहतात. त्यांच्यासोबत राहिल्यावर कधी वेळ जातो हे त्यांना कळतही नाही.
2) आत्मविश्वास
महिलांना आवडणाऱ्या पुरुधंतील गुणांपैकी एक म्हणजे कॉन्फीडन्ट, आत्मविश्वास असणारे पुरूष होय. असे पुरुष महिलांना अधिक भावतात. असे पुरुष का आवडतात? तर कॉन्फीडन्ट पुरूष हे आपल्या कोणत्याही गोष्टीवरून किंवा घेतलेल्या निर्णयावर ठाम असतात. आपले म्हणणे कोणासमोरही मांडताना ते परिणामांची पर्वा करत नाहीत. असे पुरूष कोणावरही अवलंबून राहत नाहीत. पुरूषांचा हा गुण महिलांना जास्त भावतो.
3) रोमँटिकपणा
रोमँटिकपणा हा पुरुष आणि स्त्रीमध्ये खूप महत्वाचा असतो. हा जास्त करून पती-पत्नीच्या नात्यात खूप महत्वाचा घटक मानला आहे. आपला जोडीदार (पार्टनर) हा थोडासा रोमँटिक असावा. भले तो छोट्या-मोठ्या प्रसंगी भेटवस्तू, फुले किंवा केक नाही दिला तरी चालेल, मात्र जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्याने आपले प्रेम व्यक्त करण्यात कोणतीही कसूर ठेवू नये. त्याने एखाद्या दिवशी आपल्याला पूर्णवेळ द्यावा, थोडेसे का होईना कौतूक करावे. प्रेमाने आपल्याला मिठीत घ्यावे, असे स्त्रीला वाटत असते.
4) मॅच्युर (प्रगल्भता)
महिलांना स्मार्ट लूक असणारे पुरुष आकर्षित करतातच मात्र, त्याबरोबर प्रगल्भ (मॅच्युर) असणारे पुरूष अधिक जास्त करून त्यांना आकर्षित करतात. प्रगल्भ पुरूष कोणतेही म्हणणे सुरूवातीला ऐकतात, समजून घेतात; मग त्यानंतर आपले मत व्यक्त करतात. ते कोणालाही चांगले वाटावे म्हणून कोणाच्यामध्ये उगाच हाला हा मिसळत नाहीत. ते योग्य अयोग्य तपासूनच आपले मत व्यक्त करण्याचा समजुतदारपणा दाखवतात. हीच पुरूषांमधली गोष्ट महिलांना खूप आवडते.
5) फिट (चांगले आरोग्य)
महिलांना चांगला फिटनेस असणारे तसेच त्यामध्ये शरीराची उत्तम ठेवणं राखणारे पुरुष आवडतात. कारण फिटनेस असणे हे आजकाल महत्वाचे झाले आहे. भलेही एखाद्याचे सिक्स पॅक ॲब्स नसू देत, बायसेप्स नसू देत मात्र, फिटनेसबाबत/ आरोग्याबाबत जागरूक असणारी व्यक्ती हि परफेक्ट असते असा समज काही महिलांमध्ये आहे.
6) स्टाईलिश
महिला पुरूषांतील ही गोष्ट जास्त करून बारकाईने बघतात. पुरुष कशा प्रकारची कपडे घालतो. त्याला कपड्याचा मॅचिंग सेन्स आहे का? कपड्यांची निवड ही समोरच्या व्यक्तीवर व्यक्तीमत्वाची छाप पाडत असतात. काहीवेळा कपड्यातील मॅचींग आहे का पाहण्यासाठी महिला मी,मुद्दामहून त्यांना ड्रेस किंवा साडी घेऊन येण्यास सांगतात.