महिला मध्यरात्री लघुशंकेसाठी गेली अन् जीवघेणा हल्ला

Government Hospital in Satara
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
खटाव तालुक्यातील चोराडे येथील मांगवाडा वस्तीत वन्य प्राण्याने हल्ला केला. यामध्ये महिलेला 45 टाके पडल्याचा प्रकार समोर आला आहे. विठाबाई बापूराव पिसाळ (वय- 65) असे जखमी महिलेचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बुधवार दि.15 रोजी पहाटे 2. 30 च्या सुमारास लघुशंकेसाठी महिला घरातून बाहेर अंगणात गेली होती. या दरम्यान अचानक पणे वन्य प्राण्यांने अंगावर हल्ला करून हाताला व तोंडाला जोरजोरात चावा घेतल्याने आरडाओरड झाल्याने घरातील व शेजारी लोक बाहेर पळत आल्यावर वन्य प्राणी शेजारील उसात पळून गेला. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरचा वन्य प्राणी कुत्र्यासारखा दिसत होता‌. त्यांच्या अंगावर पट्टे असल्याचे सदाशिव पिसाळ यांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच वडूज वनक्षेत्रपाल शीतल फूदे, वनपाल रामदास घावटे, वनरक्षक संजीवनी भोसले घटनास्थळी भेट दिली. सदरील घटनेची अधिक माहिती घेऊन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले.