चार शस्त्रधारी चोर एका महिलेला घाबरले, तिचा रुद्राअवतार पाहून पळतच सुटले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इंदापूर : हॅलो महाराष्ट्र – आपल्या कुटुंबावर आलेलं संकट एका महिलेने परिणामाची कसलीच चिंता न करता पळवून (women fight with four armed thieves) लावले आहे. हि घटना पुण्यतील इंदापूर शहरात घडली आहे. विशेष म्हणजे हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर हायवे लगत असणाऱ्या काझी फर्निचर शेजारी सादिक शेख यांची एक जागा आहे. या जागेवर उत्तर प्रदेशातील एक कुटुंब व काही लोक पुठ्याचा व्यवसाय करतात. या ठिकाणी राहण्यासाठी त्यांनी छोटेसे पत्र्याचे शेड उभारले आहे. याठिकाणी धर्मराज कश्यप, त्याची पत्नी नीलम कश्यप आणि त्यांचा मुलगा राहतात. त्यांच्या शेजारी त्यांचे काही नातलग राहतात.

काय घडले नेमके ?
दोन दिवसा पूर्वी 3 जून रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास चार शस्त्रधारी चोर धर्मराज कश्यप यांच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. चोरट्यांनी यावेळी कश्यप यांच्या पत्र्याच्या शेडचा समोरील पुठ्ठा काढून बाजूला टाकला व घरात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी धर्मराज कश्यप यांची पत्नी नीलम कश्यप या जाग्या होत्या. त्या आपल्या मुलाला दूध पाजत होत्या. चोर आपल्या घरात शिरत आहेत. ते आता आपल्या वरती व आपल्या मुलावर ती हल्ला करून चोरी करतील या भीतीने मुलाला काही होता कामा नये, म्हणून तिने चोरट्यांना प्रतिकार (women fight with four armed thieves) करण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी पहिल्यांदा चाकूचा धाक दाखवत त्या महिलेवर हल्ला चढवला.

महिलेचा रुद्रावतार पाहून चोरटयांनी पळ काढला
आपल्या मुलावर व आपल्या कुटुंबावर आलेले संकट परतून लावण्याचा प्रयत्न या महिलेने केला. यावेळी या महिलेला चोर चाकूचा धाक दाखवत असतानाही तिने कसलीही भीती न बाळगता या चोरट्यांच्या अंगावर धावून (women fight with four armed thieves) गेली. यानंतर या महिलेचा रुद्र अवतार पाहून शस्त्रधारी चार चोरट्यांनी घटनास्थळावरून लागलीच पळ काढला. यावेळी महिला देखील चोरांच्या पाठीमागे (women fight with four armed thieves) धावली. यावेळी तिच्या मागे तिचा पतीही त्या चोरट्यांना दिशेने पाठलाग करीत पुढे गेला. मात्र अंधाराचा फायदा घेत हे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. इंदापूर या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला आहे. तसेच इंदापूर पोलिसांनी या महिलेचे कौतुक केले आहे.

हे पण वाचा :
अशा प्रकारे गुंतवणूक करून 15 वर्षांत मिळवा 1.2 कोटी रुपये !!!

कोरोनाचं प्रमाण वाढतंय योग्य खबरदारी घ्या; केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पत्र

मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!

मी सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढणार; गोपीनाथ गडावरून पंकजा मुडेंचे सूचक विधान

आता खरी वेळ सुरु झाली आहे ; अर्ज मागे घेण्याची वेळ संपताच संजय राऊतांचा भाजपला इशारा

Leave a Comment