लालबाग परिसरात महिलेचा खून; कपाटात आढळला मृतदेह

0
143
women Murder in Lalbagh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई। मुंबईतील लगबगीचा परिसर असणाऱ्या लालबागमध्ये अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. लालबागमधील पेरू कंपाऊंड चाळीच्या परिसरातील एका घरात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनं लालबागकर हादरले आहेत. मुख्य म्हणजे, या महिलेचा मृतदेह हा एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळूत घरातील कपाटात बंद करून ठेवण्यात आला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तडक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घराची झडती घेतली असता त्यांना या महिलेचा मृतदेह आढळून आला.

मृत महिलेची ओळख पातळी असून तिचे नाव वीणा प्रकाश जैन असे आहे. या मृत महिलेचे वय साधारणत: ५० ते ५५ दरम्यान असून ती तिच्या मुलीकडे राहत असल्याची प्राथमिक माहिती तपासात आढळली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, मुलीनेच आपल्या आईचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी तो पाठवण्यात आला आहे आहे. तसेच या प्रकरणी मृत महिलेच्या मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि पोलिस तिची कसून चौकशी करीत आहेत.

अद्याप महिलेची हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली..? हे समोर आलेले नाही. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणाला मुख्य वळण येईल. या बाबत परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मृत महिला लालबागच्या इब्राहिम कासिम इमारतीत पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहते. महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने आणि भाच्याने मंगळवारी रात्री काळाचौकी पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी इमारतीत आले आणि घरात शोध घेतला असता एका कपाटात प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात २२ वर्षीय मुलीला ताब्यात घेण्यात आलं असून तिची चौकशी पोलीस करत आहे’.