हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा (World Cup 2023) थरार सुरु असून क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. सध्या वर्ल्डप कप सामने मध्यावर आले असून सेमी फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्वच संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. सध्याची स्थिती बघता भारत , दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ मजबूत स्तिथीत दिसून येत आहेत. तर पाकिस्तान , श्रींलंका आणि इंग्लंडला अजून मेहनत घ्यावी लागणार आहे.
भारतीय संघ 5 सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी: World Cup 2023
एकूण 10 संघांनी प्रत्येकी 5 सामने खेळले आहेत. भारतीय संघ 5 सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी विराजमान आहे. भारतीय संघाव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे 2 संघ सेमी फायनलसाठी क्वालिफाय करण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. टीम इंडियाने 5 पैकी 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडिया 10 पॉइंट्ससह +1.353 नेट रनरेटसह नंबर 1 आहे. दक्षिण आफ्रिका टीमने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेकडे 8 पॉइंट्स आहेत. दक्षिण आफ्रिकाचा नेट रनरेट हा सर्वाधिक +2.370 इतका आहे. न्यूझीलंडच्या खात्यात 8 पॉइंट्स आहेत. न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड तिन्ही संघ सेमी फायनलसाठी प्रबळ दावेदार आहेत. ऑस्ट्रेलिया देखील आपले खेळातील स्थान टिकवून आहे.
इंग्लंडचे वर्ल्ड कप मधील स्थान जवळ जवळ संपुष्टात:
पाकिस्तानी संघाने नेदरलँड आणि श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून विश्वचषकातील स्पर्धेची प्रभावी सुरुवात केली मात्र भारताविरुद्धच्या सामन्यात बाबर आझम व संघ टिकला नाही. मग एक एक करून ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तानने सुद्धा पाकिस्तानला पॉईंट टेबलमध्ये खालच्या बाजूस ढकलले. पराभवाच्या हॅट्ट्रिकमुळे पाकिस्तान पॉइंट टेबलमध्ये श्रीलंकेच्या खाली सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे आधी अफगाणिस्थान आणि आता श्रीलंकेकडून आठ गडी राखून पराभव पत्करावा लागल्याने गतविजेत्या इंग्लंडचे वर्ल्ड कप मधील (World Cup 2023) स्थान जवळ जवळ संपुष्टात आलेले दिसून येत आहे.