हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | World Richest Man List 2023 : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौतम अदानी आता या लिस्टमध्ये मागे पडले आहेत. गौतम अदानी लवकरच एलन मस्क यांना मागे सारून जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनतील, अशी चर्चा गेले काही दिवस ऐकायला मिळत होती. मात्र याच्या एकदम विपरीत घडताना आता ते चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. हे लक्षात घ्या कि, सध्या गौतम अदानी 118 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसहीत फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत.
जगातील तिसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे ???
गौतम अदानी हे अलीकडेच 119 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसहीत जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मात्र यावेळी त्यांना सुमारे $1 बिलियनचे नुकसान झाले. ज्यामुळे ते चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. सध्या, फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या लिस्टमध्ये फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट हे 182 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसहीत पहिल्या क्रमांकावर आहेत.
तसेच टेस्लाचे एलन मस्क यांना सध्यातरी आपले नंबर दोनचे रँकिंग वाचवण्यात यश आले आहेत. ते अजूनही 132 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसहीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याचप्रमाणे एमेझॉनचे संस्थापक असलेले जेफ बेझोस हे $ 118 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसहीत तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. World Richest Man List 2023
गौतम अदानी यांचे नुकसान
सध्या मालमत्तेतील नुकसानीमुळे गौतम अदानी यांना मानांकन घसरल्याचा फटका बसला आहे. यावेळी गौतम अदानी यांना $912 मिलियनचे नुकसान सोसावे लागले आहे. या लिस्टमध्ये फक्त गौतम अदानी असेच आहेत ज्यांच्या मालमत्तेत वाढ होण्याऐवजी घसरण झाली आहे. तसेच वॉरेन बफे हे या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. सध्या त्यांची मालमत्ता $111 अब्ज इतकी आहे. World Richest Man List 2023
मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर आहेत ???
कधीकाळी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे मुकेश अंबानी या लिस्टमध्ये 8 व्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या लिस्टनुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती सध्या $87.6 अब्ज इतकी आहे. World Richest Man List 2023
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.forbes.com/real-time-billionaires/
हे पण वाचा :
गेल्या 2 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांच्या पैशांत केली 6 पट वाढ
देशातील ‘या’ बँका Fixed Deposits वर देत आहेत जबरदस्त रिटर्न, व्याजदर तपासा
Surya Nutan Solar Stove : महागड्या गॅसपासून मिळवा सुटका, घरी आणा सौरऊर्जेवर चालणारा ‘हा’ स्टोव्ह
Bank of Baroda च्या ग्राहकांना मोठा धक्का !!! आता कर्ज घेण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे
Online Banking : चुकीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेले पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या