हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरात रस्ते सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे घटक मानले जातात. जगभरातील विकसित देशांमध्ये रस्त्याचे मोठे जाळे उभारले गेलेले आहेत. त्यामुळे देशांच्या विकासाला मोठी गती मिळालेली पाहायला मिळाली आहे. रस्त्याच्या बाबतीत अमेरिकातील जॉन एफ कॅनेडी यांचे वाक्य प्रसिद्ध आहे ते म्हणतात की, “अमेरिका श्रीमंत आहे म्हणून इथले रस्ते उत्कृष्ट आहेत असे अजिबात नाही तर अमेरिकेतील रस्ते उत्कृष्ट असल्यामुळे अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे. त्यामुळे देश्यांच्या प्रगतीत रस्त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. पण तुम्हाला जगातील सर्वात मोठा महामार्ग (Worlds Longest Highway) कोणता आहे ते माहित आहे का? चला जाणून घेऊयात….
जगात सर्वात लांबीचा समजला जाणारा महामार्ग कुठल्या एका देशात बांधलेला नसून दोन खंडांना जोडणारा हा रस्ता आहे. हा महामार्ग उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका यांना जोडण्याचे काम करतो. पॅन अमेरिकन हायवे (Pan-American Highway) असे त्याचे नाव आहे. ह्या महामार्गची लांबी तब्बल 48 हजार किलोमीटर असून उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका ह्या दोन्ही खंडातील अनेक देशातून हा महामार्ग जातो.
त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियातील महामार्ग असून तो 14500 किलोमीटर लांबीचा आहे. तिसऱ्या क्रमांकावर ट्रान्स सायबेरियन हायवे असून त्याची लांबी 11000 किलोमीटर इतकी आहे. याच्यानंतर चौथ्या क्रमांकावर कॅनडा या देशातील ट्रान्स कॅनडा हायवे असून त्याची लांबी 7821 किलोमीटर आहे. याचं यादीत भारताच्या “गोल्डन चतुर्भुज हायवे ” चे देखील नाव समाविष्ट आहे. याची लांबी 10000 किलोमीटर इतकी आहे.
भारतात तयार होतायेत जागतिक दर्जाचे रस्ते :
भारत देखील आपल्या देशातील रस्त्याचा विकास करण्यासाठी मोठी मोहीम राबवताना दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून देशातील रस्त्याचा मोठा विकास होताना दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रकारच्या महामार्गाची कामे सुरू असून उत्तम आणि विकसित अशा रस्त्यांचे जाळे विस्तारले जात आहे. रस्त्यांची उभारणी करताना त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे उत्तम दर्जाचे आणि विविध सोयी सुविधा असणाऱ्या रस्त्यांची निर्मिती भारतात देखील होत आहे. यातूनच देशाचा विकासाला चालना मिळत आहे.