चिंताजनक ! औरंगाबादेत कोरोनाचा विस्फोट; रुग्णसंख्या शंभरीपार

औरंगाबाद – जिल्ह्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा घडत होत असून, आज तर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. दिवसभरात 103 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. याच शहरात सर्वाधिक 87 तर ग्रामीण भागातील 16 रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून कळविण्यात आली आहे.

आज दिवसभरात 24 रुग्ण बरे होऊन घरी परतले यात मनपा हद्दीतील 20 आणि ग्रामीण भागातील रुग्णांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 50 हजार 39 झाली असून सध्या जिल्हाभरात 83 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.