WWE स्टार जॉन सिनाने शेअर केला ‘तो’ फोटो, विराटचे चाहते झाले कनफ्यूज!

Virat Kohli and John Cena
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – WWE स्टार जॉन सिनाने नुकताच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट हातात बॅट पकडून उभा असलेला दिसत आहे. या फोटोला काही तासांत लाखो लोकांनी लाईक केले पण जॉन सिनाने हा फोटो का शेअर केला याबाबत मात्र काहीही समजू शकले नाही. यामुळे विराट आणि जॉन सिनाचे चाहते गोंधळात पडले आहेत. हा फोटो शेअर करताना जॉन सिनाने कोणतेही कॅप्शन दिले नाही. जॉन सिना अनेकवेळा फोटो शेअर करताना त्याला कोणतेही कॅप्शन देत नाही. त्याच्या फोटोला कॅप्शन देण्याचे काम तो त्याच्या चाहत्यांवर सोडून देतो. त्याने यावेळी देखील फोटो शेअर करत कॅप्शन देण्याचे काम त्याच्या चाहत्यांवर सोडून दिले आहे.

https://www.instagram.com/p/CQBhrvStF0d/?utm_source=ig_embed&ig_rid=2e126ea8-86aa-4e43-83a6-ea3f1b90f05e

जॉन सिनाने त्याच्या इन्स्टाग्राम बायोवर याबाबतची माहिती दिली आहे. फोटोंना कॅप्शन न देता शेअर केले जाईल, त्या फोटोला जाणून घ्यायची जबाबदारी तुमची असे जॉन सिनाने त्याच्या इन्स्टाग्राम बायो मध्ये लिहिले आहे. जॉन सिनाने विराट कोहलीचा कॅप्शन शिवाय फोटो शेअर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी या फोटोबद्दल वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये जॉन सिना भारताचे समर्थन करत आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

जॉन सिनाने याआधीदेखील विराट कोहलीचा फोटो शेअर केला आहे. 2019च्या वनडे वर्ल्ड कपमध्येही भारत-न्यूझीलंड सेमी फायनलआधी जॉन सिनाने विराट कोहलीचा एक फोटो शेअर केला होता. पण त्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. त्या पराभवामुळे भारतचे वर्ल्ड कपमधले आव्हान संपुष्टात आले होते. आता भारताकडे त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.