X Online Payment Feature : आता X वरूनही करता येणार ऑनलाईन पेमेंट? एलॉन मस्क टाकणार मोठा डाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

X Online Payment Feature । सध्याच्या या आधुनिक जगात सर्वकाही ऑनलाईन झालं आहे. आजकाल खिशात पैसे ठेऊन कुठं जाण्याची गरज भासत नाही, कारण फोन पे, गुगल पे अशा काही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने एकमेकांना पैसे पाठवणे सोप्प झालं आहे. त्यातच आता एलॉन मस्क यांच्या मालकीचे प्रसिद्ध अशा X वरूनही ऑनलाईन पेमेंट सुविधा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास इतर पेमेंट्स अँप साठी हा मोठा खतरा असेल. इलॉन मस्क यांचे एक्सला सुपर अॅप बनवण्याचे स्वप्न आहे. त्या दिशेनं कंपनी काम करत आहे. याच कामाचा भाग म्हणून लवकरच एक्सवर पेमेंटची सुविधा देण्यात येणार आहे.

‘पेमेंट्स’ पर्याय दर्शविणारा एक स्क्रीनशॉट शेअर – X Online Payment Feature

एका रिसर्चरने याबाबत माहिती दिली आहे. एका ॲप संशोधकाने ॲपच्या नेव्हिगेशन बारमध्ये बुकमार्क बटणाच्या खाली एक नवीन ‘पेमेंट्स’ पर्याय दर्शविणारा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता कि, व्यवहार, शिल्लक आणि हस्तांतरणाशी संबंधित अतिरिक्त पर्याय देण्यात आले आहेत. या नव्या फीचरमुळे वापरकर्ते पैसे ट्रान्सफर करू शकतील, त्यांचे बॅलन्स चेक करू शकतील आणि ट्रांजेक्शन हिस्ट्री पाहू शकतील. एक्स पेमेंट्सला आतापर्यंत यूएसमधील 33 राज्यांमध्ये मनी ट्रान्समीटर परवाने देण्यात आले आहेत. TechCrunch च्या अहवालानुसार, देशात पैसे ट्रान्सफर करू पाहणाऱ्या कंपन्यांसाठी हे परवाने आवश्यक आहेत. त्यामुळे ऑनलाईन पेमेंटच्या दिशेनं मस्क यांनी टाकलेलं हे मोठं पाऊल म्हणता येईल.

खरं तर ज्यादिवशी एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतलं होते त्याच दिवशी त्याने प्लॅटफॉर्मवर यूजर्सना त्यांच्या खात्यांमध्ये पैसे साठवता यावे आणि इतर X वापरकर्त्यांना पैसे पाठवता यावेत या फिचर वर चर्चा केली होती. याआधी एक्स म्हणजे फक्त माहिती शेअर करण्याचे माध्यम होते. पण मस्क आल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ, ऑडिओ कॉलिंग, सबस्क्रिप्शन अशा अनेक फीचर्स आले आहेत. आता तर ऑनलाईन पेमेंटची सुविधाही (X Online Payment Feature) एक्सवर सुरु झाली तर मस्क यांच्याकडून मारण्यात आलेला हा मोठा मास्टरस्ट्रोक ठरेल. X च्या पेमेंट फीचरला लवकरात लवकर रोलआउटला करून जाहिरातीद्वारे प्लॅटफॉर्मवर कमाई करण्याच्या अलीकडील आव्हानांमुळे कंपनी कमाईचे पर्यायी स्रोत तयार करण्याचा विचार करत आहे.