अमरावती : हॅलो महाराष्ट्र – माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर (yashomati thakur) आपल्या चोख कामासाठी प्रसिद्ध आहेत. कुठल्याही सरकारी कामात चुक केलेली त्यांना आवडत नसे. यामुळे त्या अनेकवेळा सरकारी अधिकाऱ्यांना या कामासाठी फैलावर घेत असतात. असाच एक प्रसंग त्यांच्या मतदारसंघात घडला आहे. तिवसा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यशोमती ठाकूर यांनी लक्षात ठेवा मी तुमच्याकडून एक पैसाही घेत नाही. त्यामुळे कॉलिटीचे काम झाले नाही, तर मी तुमचे डोके फोडेन, असा दम त्यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
तिवसा तालुक्यात येणाऱ्या तिवसा वरुडा सुरवाडी मिर्झापूर निंभोरा बेलवाडी आणि आमदाबाद आदी ठिकाणी पुरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीची यशोमती ठाकूर यांनी आज पाहणी केली. तसेच, या परिसरात रस्त्यांच्या कामासाठी 44 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आटोपल्यावर यशोमती ठाकूर (yashomati thakur) या सर्वांसमक्ष संबंधित रस्त्याचे काम कुणाकडे आहे, अशी विचारणा करतात. तेव्हा एक अधिकारी कनिष्ठ अभियंता म्हणून आपली ओळख सांगतो आणि हे काम आपल्याकडे आहे, असे सांगतो. त्याचवेळी अधिकाऱ्यांना उद्देशून यशोमती ठाकूर या रस्त्याच्या दर्जाच्या बाबतीत तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे सांगतात. ‘मी एक रुपयाही घेत नाही, तुमच्याकडून ‘क्वालिटी’चे काम झाले नाही, तर डोके फोडीन लक्षात ठेवा’, असा इशारा त्या अधिकाऱ्यांना देतात.
यापूर्वी देखील वादग्रस्त वक्तव्य
अधिकाऱ्यांना असं बोलण्याची यशोमती ठाकूर यांची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी पोलीस कॉन्स्टेबलवर हात उगारल्याप्रकरणी माजी मंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांना अमरावती न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती. 2012 मध्ये यशोमती ठाकूर यांनी अमरावती शहरात एका ट्रॅफिक पोलिसावर हात उगारला होता. त्यावेळी शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?