हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yes Bank : गेल्या महिन्यात RBI ने रेपो दरात वाढ केली. ज्यानंतर आता अनेक बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आता आणखी एका बँकेची भर पडली आहे. आता येस बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. 18 जूनपासून बँकेकडून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. इथे हे लक्षात घ्या कि, ही वाढ फक्त 1 ते 10 वर्षे मुदतीच्या FD वरच करण्यात आली आहे.
असे असतील व्याज दर
आता Yes Bank कडून 7 ते 14 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 3.25 टक्के व्याज दर मिळत आहे. तसेच 15 ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के, 46 ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.00 टक्के तर 3 ते 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या डिपॉझिट्सवर 4.50 टक्के व्याज दर दिला जात आहे. यानंतर 6 ते 9 महिन्यांत मुदतपूर्ती होणाऱ्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 4.75 टक्के व्याज दिले जात आहे. बँक 9 महिने ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.00 टक्के व्याज देत आहे. यापैकी कोणतेही व्याजदर बदललेले नाहीत.
या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर बदलले
Yes Bank कडून 1 वर्षापासून 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 5.75 टक्क्यांनी 6.00 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. तर 18 महिने ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर बँक 6.50 टक्के दराने व्याज देईल. त्यामध्ये आता 0.50 टक्के वाढ करण्यात आली आहे. यानंतर, बँक 3 ते 10 वर्षांच्या कालावधीसह FD वर 6.50 टक्के दराने व्याज देईल.
ज्येष्ठ नागरिकांना मिळेल जास्त व्याज
60 आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी, बँक 7 दिवस ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर अतिरिक्त 0.50 टक्के व्याज मिळत आहे. त्याच वेळी, Yes Bank 3-10 वर्षांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 0.75 जास्त व्याज देत आहे.
RBI दोन वेळा वाढवला रेपो दर
RBI ने गेल्या महिन्यातही दुसऱ्यांदा रेपो रेट वाढवला. यानंतर RBI कडून बँकांना दिलेली कर्जे 0.90 टक्क्यांनी महागली. त्यामुळे बहुतेक बँकांनी आपल्या कर्जदरात 2 ते 3 पट वाढ केली आहे. इथे हे लक्षात घ्या कि, रेपो दरातील या बदलाचा परिणाम FD वरही होतो, त्यामुळे आता हळूहळू FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना रेपो दरात वाढ झाल्याचा फायदा मिळू लागला आहे. Yes Bank
अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.yesbank.in/personal-banking/yes-individual/deposits/fixed-deposit
हे पण वाचा :
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 75 मध्ये फ्री कॉलिंग सहित मिळतोय 2.5GB डेटा !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजच्या किंमती तपासा
Airtel ने ग्राहकांना दिला धक्का ! आता पोस्टपेड प्लॅन 200 रुपयांनी महागले
Multibagger Stocks : गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!