नवी दिल्ली । गेल्या दोन ते तीन वर्षात ज्या शेअर्सने गुंतवणूकदारांचे सर्वाधिक पैसे बुडविले त्यातील येस बँकेचा वाटादेखील आहे. 17 ऑगस्ट 2018 रोजी येस बँकेचे शेअर्स 393.20 रुपयांवर ट्रेड करत होते आणि आज हे शेअर्स 12.90 रुपयांवर अडकले आहेत, जे त्यावेळेच्या पातळीपासून सुमारे 95 टक्क्यांनी खाली आहेत. बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना बोर्डातून बाहेर करण्याचा आणि मोरेटोरियमचा निर्णय मार्च 2019 मध्ये घेण्यात आला. त्यानंतरही येस बँकेचे शेअर्स त्याच्या जुन्या स्तरावर परत येऊ शकलेले नाहीत.
शेअर्स 25% पर्यंत खाली येऊ शकतो
अशा स्थितीत, जर तुम्हीही गेल्या दोन वर्षांपासून हा स्टॉक घेऊन वाढीच्या अपेक्षेने बसलेले असाल, तर बाजारातील तज्ज्ञांचा सल्ला काय आहे, आपण आणखी थांबावे की, विकावे आणि बाहेर पडावे यापैकी काय चांगले आहे ते जाणून घ्या. Emkay Global ने Yes Bank च्या शेअर्सना SALE रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज फर्म म्हणते की, येस बँकेचे शेअर्स सध्याच्या पातळीपेक्षा 25 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतात. Emkay Global चा असा विश्वास आहे की, येस बँकेचे शेअर्स 10 रुपयांपर्यंत येऊ शकतात.
तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या?
Emkay Global चे म्हणणे आहे की,”आर्थिक वर्ष 2021 च्या चौथ्या तिमाहीत झालेल्या नुकसानीनंतर बँकेने आर्थिक वर्ष 2022 च्या जून तिमाहीत नफा कमावला आहे. कमी तरतूद आणि जास्त उत्पन्न यामुळे जून 2021 च्या तिमाहीत बँकेचा नफा 2.1 अब्ज रुपये राहिला. या ब्रोकरेज फर्मच्या मते, येस बँकेची सर्वात मोठी समस्या ही आहे की, तिची पत वाढ कमी आहे. कमी कॉर्पोरेट कर्जामुळे जून तिमाहीत येस बँकेची पत 1.7 लाख कोटी रुपये झाली आहे.