पाकिस्तानी वृत्तपत्राकडून योगींचे कौतुक; इम्रान खान यांना घरचा आहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. विविध देश त्यांच्या पातळीवर या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व देशातील स्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काहींना यश येते आहे तर काहींचे प्रयत्न सुरु आहेत. असे असताना पाकिस्तानातील एका वृत्तपत्राने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक त्यांच्या वृत्तपत्रातून केले असल्याची घटना समोर आली आहे. ‘डॉन’ असे या वृत्तपत्राचे नाव आहे.

उत्तरप्रदेश सारख्या लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना विषाणूच्या संक्रमणाची परिस्थिती अतिशयउत्तम हाताळली आहे. म्हणून पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन ने योगींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पाकिस्तानी माध्यमातून योगींचे कौतुक ही बाब आश्चर्यकारक अशीच आहे. या वृत्तपत्राचे संपादक फहद हुसैन यांनी योगींचे तोंडभरून कौतुक केले आहे. ते डॉनच्या इस्लामाबाद आवृत्तीचे संपादक आहेत.

दरम्यान पाकिस्तान ला कोरोना संक्रमणातून बाहेर पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे असे म्हणत त्यांनी इम्रान खान यांच्या सरकारवर टीकाही केली आहे. याचवेळी त्यांनी पाकिस्तान आणि उत्तरप्रदेश यांची तुलना करीत योगींचे कौतुक केले. रविवारी सकाळी फहद हुसैन यांनी पाकिस्तान आणि उत्तर प्रदेश यांच्या करोना व्हायरसच्या हाताळणीमधला फरक दाखवून देणारा एक आलेख टि्वट केला. संचारबंदीचे काटेकोर पालन केल्यामुळे उत्तरप्रदेशमधील मृतांची संख्या कशी कमी आहे हेही या आलेखात त्यांनी म्हंटले आहे. उत्तर प्रदेश आणि पाकिस्तानची लोकसंख्या जवळपास सारखीच असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.